Inter Cropping : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

Kharif Crop Planning : पावसाचे आगमन ८ जुलै ते १५ जुलै दरम्यान झाल्यास मूग,  उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल ही पिके घ्यावी लागतील.
Inter Cropping Method
Inter Cropping MethodAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके

Monsoon Based Crop Planning :

पावसाचे आगमन ८ जुलै ते १५ जुलै दरम्यान झाल्यास मूग,  उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल ही पिके घ्यावी लागतील. पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळा, तीळ या पिकांबरोबरच सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. विशेष करून सोयाबीन आणि कपाशी या पिकांची पेरणी उत्पादनात घट येईल हे गृहीत धरून उशिरात उशिरा ३१ जुलैपर्यंत करावी. त्यानंतर या पिकांची लागवड करू नये.

पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. कापसाची पेरणी खोल व मध्यम खोल काळ्या जमिनीतच करावी हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.

कपाशी + तूर (१०:२ किंवा ६:१) किंवा सोयाबीन + तूर (४:२) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

सोयाबीन पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा.

मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.

हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळा, एरंडी पिके घ्यावीत. कपाशीमध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१)याप्रमाणे आंतरपीक घ्यावे.

Inter Cropping Method
Inter Cropping : हरभरा-ज्वारी पद्धती ठरली फायदेशीर

तूर पिकामध्ये भारी जमीन आणि एक ते दोन सिंचन असल्यास बीएसएमआर ७३६, गोदावरी, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७१६ या वाणांची निवड करावी. बीडीएन ७११ हे वाण कमी कालावधीचे वाण असून त्यांचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करावा.

जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल. त्याचा पिकांना लाभ होईल.

प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी). प्रत्येक पिकामध्ये शिफारशीनुसार कीटकनाशके, बुरशीनाशके, जिवाणू संवर्धक, मित्र बुरशी संवर्धनाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. जेणेकरून अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खताचा वापर करावा. जेणेकरून जमिनीचे जैविक, भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होईल. यातून जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म योग्य राहून पीक उत्पादनात वाढ होईल.

पावसाच्या खंडातील उपाययोजना

बऱ्याच वेळा सुरुवातीस पावसाच्या आगमनानंतर एक ते दोन खंड विशेष करून जुलै - ऑगस्ट महिन्यात आढळून येतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरिपुष्पाचा पाला, सोयाबीन, भात, वाद का/भुसा, मातीची भर इत्यादी). पिकानुसार ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा अवलंब करावा. पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) १ ते १.५ टक्के (१०० ते १५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी. हलक्या कोळपण्या कराव्यात. जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात. जेणेकरून जमिनीतील ओलावा उडून जाणार नाही.

Inter Cropping Method
Inter Cropping : पूर्वहंगामी उसामध्ये योग्य आंतरपिकांची निवड

उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी

खरीप पिकांच्या पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीच कामे पूर्ण झाल्यानंतर बळीराम किंवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळींमध्ये (ठरावीक अंतरावर किंवा ठराविक ओळीनंतर) उदा. कापूस, तूर या सारख्या जास्त अंतरावरील पिकामध्ये अंतरानुसार प्रत्येक एक ते दोन ओळीनंतर आणि तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळीनंतर सऱ्या काढाव्यात.

१५ ते २० सेंमी खोलीच्या अरुंद सऱ्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संधारण होण्यास तसेच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासही मदत होते.

हलकी कोळपणी

पावसाचा खंड आढळून आल्यास हलक्या कोळपण्या करून जमिनीच्या भेगा बुजविण्यात याव्यात. यामुळे ओलावा टिकवून ठेवता येतो. जमिनीतील ओलाव उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.

- डॉ.आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com