Monsoon Break : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता.३)पासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असून, भारतीय हवामान विभागाने ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस सुरू असल्याने गंगापूर, दारणा यांसह १७ धरणांतून एकूण ७५ हजार १३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे..नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागातही पावसाचा प्रभाव कमी झाला असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. उर्वरित तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. ४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात ५३७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ती दीर्घकालीन सरासरीच्या १०३.८ टक्के आहे. म्हणजेच जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३.८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, तालुकानिहाय चित्रात मोठी तफावत दिसून येत आहे..Dhule Rain Update: धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के पाऊस.त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक १,९५७.६ मिलिमीटर (१५२.१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. निफाड, दिंडोरी, बागलाण, कळवण, नाशिक, देवळा आणि चांदवड तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सुरगाणा तालुक्यात पावसाची टक्केवारी १११.६ वर पोहोचली आहे. मात्र, इगतपुरी तालुक्यात अद्याप केवळ ८८८.५ मिलिमीटर, म्हणजेच सरासरीच्या ५०.२ टक्के पावसाची नोंद झाल्याने हा तालुका चिंतेचा विषय ठरला आहे. मंगळवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, दिंडोरी, निफाड आणि पेठ तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला, तर बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहिला..Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात अधूनमधून हलका पाऊस.धरणांमध्ये ८९.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यातील २६ मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ६३,५२५ दशलक्ष घनफूट, म्हणजेच ८९.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा सुमारे १५ टक्क्यांनी अधिक आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सर्वाधिक २२,७७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, गिरणा, पालखेड, गंगापूर, करंजवण, चणकापूर, दारणा आणि वालदेवी धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. .आळंदी, चणकापूर, वाघाड, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, केळझर आणि भोजापूर ही धरणे शंभर टक्के भरली असून, जिल्ह्यातील धरणांमधील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.