Poultry Industry: यंदाच्या तीव्र उन्हाळ्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसल्याने राज्यातील अंडी उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतूक झाल्याने बाजारातील अंड्यांचा पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. .सध्या घाऊक बाजारात अंड्यांचा दर प्रति शेकडा ७२० रुपयांवर पोहोचला असून, किरकोळ बाजारात प्रति अंडे ९ रुपये दराने विक्री होत आहे. चालू वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे..पोल्ट्री उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात अंड्यांचा घाऊक दर प्रति शेकडा ४८० रुपये होता. त्यानंतर जूनपासून बाजारात हळूहळू तेजी सुरू झाली आणि दर ६८० रुपये प्रति शेकडा या पातळीवर पोहोचले. जुलैच्या सुरुवातीला पुरवठ्यात आणखी घट झाल्याने दरात पुन्हा वाढ होऊन सध्या ७२० रुपये प्रति शेकडा असा व्यवहार सुरू आहे. अवघ्या दोन महिन्यांत अंड्यांच्या दरात सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे..Eggs Production: सांगलीत अंडी उत्पादनात ८ लाखांची घट.राज्यात दररोज सुमारे एक कोटी अंड्यांची मागणी असल्याचे पोल्ट्री क्षेत्रातील जाणकार सांगतात. मात्र उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे अनेक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू वाढला. त्याचबरोबर उष्णतेच्या ताणामुळे अंडी देण्याचे प्रमाणही घटले. परिणामी, उत्पादन कमी झाले आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडू लागल्याने दर झपाट्याने वाढले..तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात सर्वसाधारणपणे अंड्यांच्या मागणीत वाढ होत असते. या काळात आधीच उत्पादन घटले असल्याने बाजारातील तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. उत्पादन पूर्वपदावर येण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने सध्या तरी अंड्यांच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांचे मत आहे..Eggs Incubator: टाकाऊतून टिकाऊ अंडी उबवण यंत्राचा ‘जुगाड’.दरवाढीचा परिणाम थेट ग्राहकांवर होत असून, हॉटेल व्यवसाय, बेकरी उद्योग आणि अंड्यांवर आधारित खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांचाही खर्च वाढला आहे. दुसरीकडे, ज्या पोल्ट्री उत्पादकांकडे उत्पादन टिकून आहे, त्यांना वाढीव दराचा काही प्रमाणात फायदा होत असला, तरी उन्हामुळे झालेल्या नुकसानीमुळे हा लाभ मर्यादित असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकार सांगतात..बाजाराचा कलपोल्ट्री फार्ममधील उत्पादन पूर्ववत होईपर्यंत अंड्यांचा पुरवठा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्पावधीत अंड्यांचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..अंड्यांच्या दराचा मागोवामे २०२६ ४८० रुपये प्रति शेकडाजून २०२६ ६८० रुपये प्रति शेकडासध्याचा दर ७२० रुपये प्रति शेकडाकिरकोळ बाजार ९ रुपये प्रति अंडे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.