Pune News: मॉन्सून हंगामात पावसाने साथ दिल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. ट्रॅक्टर अँड मेकनायझेशन असोसिएशच्या आकडेवारीनुसार देशात ऑगस्ट २०२५ मध्ये ७३,१९९ ट्रॅक्टर विकले असून ऑगस्ट २०२४ मध्ये ही संख्या ५४,७३३ इतकी होती. तर जुलै २०२५ च्या तुलनेतही ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत थोडीशी वाढ झाली असून जुलै महिन्यात एकूण ७२,७९७ ट्रॅक्टरची विक्री झाली होती..यंदा मॉन्सूनचे सर्वसाधारण तारखेच्या आधीच केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर काहीशी वाटचाल थबकली होती. परंतु २९ जूनपर्यंत मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. देशभरात खरीप पेरणीला वेग आला. त्यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढली आहे, असे जाणकार सांगतात..Tractor Sales : जीएसटी कपातीमुळे ट्रॅक्टर खरेदी नवरात्रीनंतर गती घेणार? .मॉन्सून हंगामातील पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना मदत होणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर सणांचा कालावधी असतो. नवरात्र, दिवाळी या सणामध्ये ट्रॅक्टर खरेदीला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे पुढील काळातही ट्रॅक्टरची मागणी वाढेल, असा उद्योगाकडून दावा केला जात आहे..Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार.ग्रामीण भागातील वाढत्या मजूर टंचाईमुळे शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाला नवीन दिशा मिळत आहे. शेतकरी अधिकाधिक तंत्रज्ञान स्वीकारत आहेत, असे असले तरी यांत्रिकीकरणात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान निर्माण होत नाही, असे शेतकरी सांगतात..जीएसटी धोरणात बदलाचा सकारात्मक परिणामनुकतेच ५६ व्या जीएसटी परिषदेत ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर पार्टसवरील जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात ट्रॅक्टर खरेदीला चालना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, कृषी उपकरणांवरील जीएसटी कपातीमुळे संघटित क्षेत्राला फायदा होणार असून, देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगाला चालना मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.