Monsoon Update : बळीराजासाठी खुषखबर; मॉन्सून केरळमध्ये दोन दिवस आधी दाखल!

Monsoon Entered Kerala : यंदा मॉन्सून केरळमध्ये लवकर दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

Pune News : केरळमध्ये गुरूवारी (ता. ३०) मॉन्सून दाखल झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. नेहमीपेक्षा दोन दिवस आधी मॉन्सून केरळमध्ये आला आहे. हवामान विभागाने ट्वीट करून मॉन्सूनच्या आगमनाची बातमी दिली आहे. मॉन्सूनने यंदा केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस

मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मात्र दोन दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला.

यंदा देशभरात दीर्घकालिन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Monsoon
Monsoon Update : माॅन्सून दाखल झाल्यानंतरही पावसात खंड का पडतो?

राज्यासह देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असून विविध ठिकाणी उष्माघाताने बळी गेले आहेत. राज्यातही विदर्भातील पाच जनांचा मृत्यू उष्माघाताने झाला असून उन्हाच्या तडाख्याने उभी पीके पिवळी पडत आहेत.

राज्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठला असून सध्या १३८ प्रमुख धरणांमध्ये फक्त १९.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ही माहिती जलसंपदा विभागाच्या माहितीवरून समोर आली असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यादरम्यान मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याने राज्यासह देशभरातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com