डॉ. सचिन नलावडे मागील लेखामध्ये आपण फळपिकांमध्ये अधिक उत्पादनासाठी वेलीला किंवा झाडांना आकार देणे (ट्रेनिंग) आणि छाटणी (प्रूनिंग) या विषयी माहिती घेतली. या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक साधनांची (पॉवर टुल्स), सेन्सर्स आणि ऑटोमेशन प्रणालींची माहिती घेऊ. .पारंपरिक पद्धतीने हस्तचलित कात्र्या आणि अवजारे वापरून छाटणी केली जाते. द्राक्ष बागेसारख्या आधुनिक फळबागांमध्ये आकार देणे आणि छाटणीचे काम जलद, अचूक आणि कार्यक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो..Fruit Crop Pruning: फळबाग छाटणी का गरजेची? .इंजिन किंवा बॅटरी चलित साधने (पॉवर टूल्स)पारंपरिक हस्तचलित साधनांच्या तुलनेमध्ये मानवी कष्ट व वेळेची बचत करण्यासाठी ही स्वयंचलित साधने वापरली जातात. त्यामुळे कामात अचूकताही येते. मानवी हाताने साधनाला मिळणारी ताकद ही मर्यादित असते. सलग अधिक काळ काम करणेही माणसाला शक्य होत नाही. त्याच प्रमाणे एकाच प्रकारचे काम सातत्याने केल्याने माणसांचे ते काम करणारे स्नायू दुखावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी साधने चालविण्यासाठी अन्य ऊर्जा स्रोताची (उदा. इंजिन, बॅटरी इ.) मदत पॉवर टूल्समध्ये घेतली जाते..Fruit Crop Pruning: फळबाग छाटणी कधी आणि का करावी?.इलेक्ट्रिक/बॅटरी प्रूनिंग सिजर्सवापर : छाटणीसाठी वापरले जाणारे हे सर्वांत महत्त्वाचे उपकरण आहे. हे विजेवर किंवा रिचार्जेबल बॅटरीवर चालते.फायदा : कमी वेळात, कमी श्रमात छाटणी करता येते.टायिंग मशिन (Tying Machine) / वेली बांधण्याचे यंत्रवापर : आकार देणे देताना वेलीच्या फांद्यांना आधार देण्यासाठी (ट्रेलिस/मांडव) बांधण्यासाठी..ट्रॅक्टर-माउंटेड प्रूनरवापर : मोठ्या बागेत ओळींच्या छाटणीसाठी वापरले जाते. ही मशिन वेलीचा आवश्यक भाग सोडून उर्वरित भागाची छाटणी एकाच वेळी करते.जीपीएस-आधारित ट्रॅकिंगकार्य : जीपीएस/आरटीके सेन्सर वापरून ट्रॅक्टर दिलेल्या ओळींमध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा कमी हस्तक्षेपाने चालतो.फायदा ः यामुळे छाटणीच्या कामात अचूकता येते..रोबोटिक प्रूनिंगकार्य : काही प्रगत स्वयंचलित प्रणाली व्हिजन सेन्सर्स आणि AI चा वापर करून छाटणीसाठी योग्य काड्या ओळखतात आणि नंतर अत्यंत अचूकपणे त्यांची छाटणी करतात.फायदा ः हे तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादनात वाढ होते, पाण्याची आणि खतांची बचत होते आणि मजुरीचा खर्च कमी होतो, तसेच छाटणीची गुणवत्ता सुधारते.- डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.