Solapur News: शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक पद्धतीने पिकांची लागवड न करता, आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म नियोजनावर भर दिला पाहिजे. पिकांच्या गुणवत्तेसह उत्पादकतावाढ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक शेतकरी, श्रीरंग लाड यांनी शनिवारी (ता. २१) केले..लोकमंगल कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे आणि श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती..Modern Farming Technology: माळसोन्ना गावाला अग्रेसर बनवू .लाड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कपाशीच्या पिकाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, आज पारंपारिक पद्धतीला पूर्णपणे बाजूला करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, कपाशीच्या झाडाच्या खालच्या बाजूला येणाऱ्या अनावश्यक फांद्या कट केल्यास वरच्या बोंडांचे वजन वाढते. केवळ अशा छोट्या बदलांमुळे पाच-सहा क्विंटलचे उत्पादन थेट तिपटीने वाढू शकते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रीय दृष्टिकोन जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले..कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार देशमुख यांनी तरुणांना शेती व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की राज्यात समृद्ध शेतकऱ्यांचा समूह तयार झाला, तरच देश प्रगती करेल. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले..Modern Farming Technology: शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज.रोहन देशमुख यांनी प्रास्ताविकात ‘लोकमंगल कृषी पुरस्कारा’चे महत्त्व स्पष्ट केले. यावर्षीपासून सुरू झालेली ही परंपरा यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध विभागांतील यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित कुरे यांनी केले, तर आभार डॉ. सचिन फुगे यांनी मानले..पुरस्कार विजेते शेतकरीपश्चिम महाराष्ट्र : शशिकांत पुदे (मोहोळ), रवींद्र धुमाळ (फलटण).उत्तर महाराष्ट्र : कल्याणी मुरदारे (शेवगाव), अर्जुन तोरवणे (धुळे).मराठवाडा : रवींद्र देवरवाडे (अंबाजोगाई), यज्ञेश कातबाने (पैठण).कोकण : उत्तम फोंडेकर (मालवण), अनिल शिगवण (दापोली).विदर्भ : स्वप्नील रावनकर (अकोला), वर्षा लांजेवार (चंद्रपूर).सोलापूर जिल्हा : संतोष काटमोरे (बार्शी), निखिल कदम (माढा), प्रमोद इंगळे (माढा)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.