
MLA Monica Rajale : राज्यातील अनेक भागांना दुष्काळाचे चटके सोसावे लागत असून राज्य सरकारने नदी जोड योजना हाती घेतली आहे. अशाच योजनेच्या माध्यमातून जायकवाडी व मुळा धरणातून उपसा सिंचन योजना राबवली जाणार आहे. या योजनेत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गोदावरी खोरे परिसरातील कायम दुष्काळी गावांचा सामावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी ही मागणी शनिवारी (ता.२१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर आज (ता.२२) माहिती दिली आहे.
गेल्या सहा दिवसापासून उपराजधानी नागपुरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्याचे शनिवारी (ता.२१) सूप वाजले असून आता ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होईल. राज्यातील आमदार आपल्या मतदारसंघातील विविध मागण्या आता सरकार दरबारी मांडताना दिसत आहेत.
शेवगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राजळे यांनी, सरकारची ‘गोदावरी’योजना प्रस्तावित आहे. यातून जायकवाडी व मुळा धरणातून उपसा सिंचन योजना राबवली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी गोदावरी खोरे परिसरात ८० टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी खोरे परिसरात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच राजळे यांनी, आपल्या निवेदनात, शेवगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांच्या अनेक गावात पाण्याचा प्रश्न असून ती कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. यात शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग, पाथर्डी तालुक्यातील भालगाव, माणिकदौंडी, कोरडगाव व माळीबाभूळगाव परिसर येतो. या भागात शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्धत नसल्याने स्थलांतरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जनता विशेषता ऊसतोड मजुरीकडे वळत आहेत. ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.
मतदारसंघातील या दोन्ही तालुक्यांत गोदावरी खोरेतंर्गत येणाऱ्या गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी कोणताही आराखडा मंजूर झालेला नाही. यामुळे अनेक वर्षांपासून येथील जनता हक्काच्या पाण्याची मागणी करत आहेत. आता सरकार दरबारी नदी जोड योजनेच्या माध्यमातून गोदावरी खोरेत ८० टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्ताव आहे.
या योजनेतून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांना पाणी देण्यात यावे. यामुळे दोन्ही तालुक्यातील गावांना कायमस्वरूपी दुष्काळावर मात करता येईल. या गावांना जायकवाडी आणि मुळा धरण उपसा सिंचन योजनेचा लाभ मिळेल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करत शासनस्तरावर निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.