Bachchu Kadu : शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंचा महायुतीला इशारा

MLA Bachu Kadu News : गेल्या काही दिवसांपासून महायुतीतून प्रहार संघटना बाहेर पडणार अशी चर्चा सुरू होती. यादरम्यान आता संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनीच महायुतीतून आपण बाहेर पडू असा इशारा दिला आहे. 
Bachchu Kadu
Bachchu KaduAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुका काहीच महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्याआधी सत्ताधारी महायुतीत मित्र पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याचे बोलले जात होते. तर ते युतीतून लवकरच बाहेर पडतील असेही बोलले जात होते. यादरम्यान मंगळवारी (ता. ०९) कडू यांनी वक्तव्य करताना, सरकारने शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांचा विचार केला नाही, तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. कडू यांच्या वक्तव्यामुळे आता ऐण निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे टेन्शन वाढले असून तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीसह विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीला पर्याय देण्याची तयारी कडू यांची दिसत आहे. तर प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि राज्यातील आम आदमी पार्टी एकत्र येऊन तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत वलकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करतील असेही चर्चा सुरू आहे. 

Bachchu Kadu
Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

यादरम्यान बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सध्या आपण काही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर राज्यातील शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी काही चांगले निर्णय होऊ शकतात. आम्ही आमच्या खुशीपेक्षा शेतकरी आणि दिव्यांगाच्या मुद्द्यावर लढत आहोत. या घटकांच्या संदर्भात आमच्या मागण्या असून त्याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना भेटणार आहोत. जर योग्य आणि सकारात्मक चर्चा झाली, आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही स्वतंत्र लढणार नाही. 

आम्ही काही महायुतीकडे किंवा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मंत्रीपद मागत नाही. तर पुढेही तशी आपेक्षा ठेवणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आधी शेतकरी, मजूर, प्रकल्पग्रस्तांसह दिव्यांगांबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही स्वतंत्र लढू. तिसऱ्या आघाडीचे माहित नाही, पण येत्या निवडणुकीत १५ ते २० ठिकाणी उमेदवार देऊ, अशी भूमिका कडू घेतली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com