Sugarcane Farming : ज्ञानाच्या उपासनेतून ऐश्वर्य

Mixed Cropping : शेतीचा अनुभव घेता घेता तारुण्यात कधी आलो तेच कळलं नाही. गहू, ज्वारी, हरभरा असं पारंपरिक पद्धतीचं रहाटगाडगं सुरू होतं. वेगळं काही घडत नव्हतं. एकदा एका वृत्तपत्रात सांगली जिल्ह्यातील ऊस शेतीचा प्रयोग वाचनात आला.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Drip Irrigation : मी बाळासाहेब पाटील. धाराशिव जिल्ह्यातील सरमकुंडी (ता. वाशी) हे आमचं दुष्काळी पट्ट्यातील गाव. वडिलोपार्जित ६० एकर शेती. त्यातील ३० एकर पडीक. सन १९८० चा काळ असेल. वडील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता होते. पारंपरिक शेतीत ज्वारी, मका आदींमधून हाती काहीच लागत नव्हतं.

मला आठवतं, की १९७७ मध्ये मी दहावी झालो त्या वेळी घरावर २७ लाखांचं कर्ज होतं. आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकणं होईना. सरळ शेतीत उतरलो. कर्ज वाढत चालले तसे वडिलांनी काही शेती विकण्याचा निर्णय घेतला. मी मात्र शेती विकू नये यासाठी त्यांना परावृत्त केलं.  

शेतीचा अनुभव घेता घेता तारुण्यात कधी आलो तेच कळलं नाही. गहू, ज्वारी, हरभरा असं पारंपरिक पद्धतीचं रहाटगाडगं सुरू होतं. वेगळं काही घडत नव्हतं. एकदा एका वृत्तपत्रात सांगली जिल्ह्यातील ऊस शेतीचा प्रयोग वाचनात आला. थेट पाहण्यासाठी गेलो. इथंच माझ्या ज्ञानाची पहिली खिडकी उघडली. धाडस करून दोन एकर ऊस लावण्याची दृष्टी मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याने आल्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याची माहिती समजली. तिथे चक्क तीन दिवस थांबून अभ्यास केला.

आपल्या अर्ध्या एकरात हा प्रयोग केला. क्षेत्र दोन एकर वाढवले. सुधारित शेती पद्धतीने पहिले यश दाखविले ते ऊस पिकात. दहा एकरांतून एकरी ५० टनांप्रमाणे उत्पादन मिळाले. ही माझ्यासाठी सर्वांत आनंदाची घटना होती. शेतीत आपण काहीतरी घडवू शकतो हा आत्मविश्‍वास त्यातून मिळाला. पुढे उत्पादनात अजून १० टनांनी वाढ करणं शक्य झालं.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : पर्यायी पीक म्हणून उसाचा पर्याय योग्य

ज्ञानाची भूक
आता ज्ञानाची आस लागली होती. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांची माहिती घेणे, ते प्रत्यक्ष जाऊन पाहणे, नव्या तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणे हे व्यसनच जडले.

त्यातून माझ्यातील प्रयोगशील वृत्तीला खतपाणी मिळाले. घरची परिस्थिती शेतीतून बदलणे शक्य आहे हा विश्‍वास दृढावला. मला एकट्यालाच नव्हे, तर कुटुंबातील अन्य सदस्यांनाही माझ्या विचारांची संगत आणि प्रयोगांची नकळत गोडी लागली.  

Sugarcane Farming
Sugarcane Farming : नद्यांच्या पातळीत घट, ऊसशेतीसमोर उभे संकट

‘ॲग्रोवन’ दैनिकातील लेख, बातम्या, यशोगाथा एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वाचू लागलो. ज्ञानाची भूक लागली होती. मोहोळ (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्याच्या डाळिंब शेतीची यशकथा वाचली. बागेची पाहणी केली. त्या प्रेरणेतून पाच एकर डाळिंब बाग लावली.

प्रयत्नांना चांगल्या व्यवस्थापनाची जोड दिली. एकरी १० टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत मजल मारली. कष्टाचे गोड फळ १० लाख रुपयांच्या रूपात मिळू शकते याचा प्रत्यय या शेतीतून आला. त्यातून कर्ज फेडले. शेतीतील पुंजीतूनच १९ लाख रुपयांचे घर बांधण्यापर्यंत प्रगती करू शकलो.

दुष्काळाचं संकट  
उत्पन्न वाढणं गरजेचं होतं. म्हणून शेतीपूरक व्यवसायाच्या शोधत होतो. दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा प्रेरणादायी वाटून भाऊ सुंदरला सोबत घेत भेट दिली. इत्थंभूत माहितीच्या आधारे व्यवसाय सुरू केला. टप्प्याटप्प्याने गायी घेत गेलो. कर्ज घेऊन शेड उभारले. गायींची संख्या २० पर्यंत पोहोचली. ‘बायोगॅस प्रकल्प’ उभारला. त्यासाठी शासनाचे पाच लाखांचे अनुदान मिळाले. प्रकल्प पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येऊ लागले.

आमची प्रेरणा घेऊन हिंगोली, परभणी, सोलापूर आदी जिल्ह्यांतही काही प्रकल्प उभे राहिले. बायोगॅस प्रकल्पातील स्लरीचा वापर आम्ही पिकांना करू लागलो. त्यातून टोमॅटो व अन्य पिकांची गुणवत्ता वाढवत ही पिकं यशस्वी केली. सारं सुरळीत सुरू असतानाच २००६-०७ मध्ये दुष्काळ पडला. चारा-पाण्याची सोय करणे कठीण झाले. नाइलाजाने गायी विकाव्या लागल्या. बायोगॅस प्रकल्प बंद करावा लागला. या संकटामुळे नैराश्‍य जरूर आलं. पण हिंमत हरलो नाही.

...अन् दुष्काळावर मातही
आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान, धडाडी आणि धाडस एकवटलं. शेतीत यशस्वी व्हायचं तर दुष्काळावर मात केल्याशिवाय पर्याय नाही हे उमगलं. आधी सहा नंतर तीन अशा नऊ कूपनलिका खोदल्या. आज त्यातील सात व्यवस्थित सुरू आहेत. साडेतीन लाख रुपये खर्चून नजीकच्या दहीफळ टॅंक येथून चार किलोमीटरपर्यंत पाइपलाइन केली.

वडिलोपार्जित विहिरीत पाइपलाइनद्वारे आणलेले व कूपनलिकांमधील पाणी साठविण्यास सुरुवात केली. आज याच पद्धतीचा वापर करतो. संपूर्ण शेतात पाइपलाइनचे जाळे उभारले आहे. पाटाने पाणी अजिबात देत नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करताना ठिबक सिंचन, स्प्रिंकलरद्वारे सिंचन करतो.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com