Defense Innovation : नाशिक कृषीमालाचे मूल्यवर्धन आणि संरक्षण दलाच्या अन्नपुरवठ्याच्या गरजा यांची सांगड घालत मॅग्नस फार्म फ्रेश लिमिटेड आणि टेरिटोरियल आर्मी इनोव्हेशन सेल यांच्यात कोलकाता येथे नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून दुर्गम, उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत तैनात जवानांसाठी पोषणमूल्ययुक्त, सुरक्षित, सहज वापरता येणारे आणि दीर्घकाळ टिकणारे तयार खाद्यपदार्थ विकसित करण्यासाठी संशोधन केले जाणार आहे..कोलकाता येथे झालेल्या ‘टीए-२.०’ परिसंवादात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मका, बीटरूट यांसारख्या कृषीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्याचा मॅग्नस फार्म्सचा अनुभव या संशोधनासाठी उपयोगी ठरला आहे. .Argentine Agricultural Cooperatives: अर्जेंटिनातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल .जवानांची ऊर्जा व प्रथिनांची गरज, अन्नाचे वजन व प्रमाण, प्रादेशिक आहारपद्धती, प्रशिक्षण, प्रत्यक्ष तैनाती, उंचावरील कार्यक्षमता आणि आपत्कालीन परिस्थिती यांचा विचार करून खाद्यपदार्थांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती मॅग्नस फार्म फ्रेशचे संस्थापक-संचालक लक्ष्मण सावळकर यांनी दिली. सामंजस्य करारावेळी श्री. सावळकर आणि भारतीय सैन्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर एस. एस. पाटील उपस्थित होते..शीतसाखळीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्नया संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रिटॉर्ट’ प्रक्रिया. हवाबंद पॅकेजमध्ये अन्न भरल्यानंतर नियंत्रित पद्धतीने सुमारे १२० अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर जलद थंडकरण केले जाते. यामुळे अन्न सुरक्षित ठेवण्यास मदत होते. योग्य पॅकेजिंग व प्रक्रियेमुळे उत्पादनांची सामान्य तापमानात ९ ते १८ महिन्यांपर्यंत टिकवणक्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विकसित केलेल्या या प्रक्रियेचा वापर सध्या स्वीटकॉर्न, बीटरूटसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांसाठी केला जात आहे. याच तंत्रज्ञानावर आधारित तयार खाद्यपदार्थांच्या प्रायोगिक चाचण्या सेनेसह घेण्यात आल्या असून, बर्फाळ आणि दुर्गम भागातील जवानांपर्यंत अन्न पोहोचविण्याच्या प्रयोगालाही प्रतिसाद मिळाला आहे. शीतसाखळीची गरज कमी झाल्यास पर्वतीय भाग, सीमाक्षेत्र आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात अन्नाची साठवणूक व वाहतूक अधिक सुलभ होऊ शकते..प्रतिकूल परिस्थितीतही जवानांना पोषणमूल्यपूर्ण आणि विश्वासार्ह अन्न उपलब्ध करून देणे, हा या संशोधनामागील मुख्य उद्देश आहे. सेनेसाठी नफा-तोट्यापेक्षा सेवा महत्त्वाची मानून हा उपक्रम राबवत आहोत. आव्हानात्मक परिस्थितीतही पौष्टिक, दीर्घकाळ टिकणारे, वापरण्यास सोयीस्कर आणि विश्वासार्ह अन्न उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. कारण अशा परिस्थितीत अन्न हे केवळ जगण्यासाठीची गरज नसते, तर मोहिमेच्या यशासाठी ते एक महत्त्वपूर्ण साधन ठरते.- लक्ष्मण सावळकर, संस्थापक-संचालक, मॅग्नस फार्म फ्रेश लिमिटेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.