GM Musterd : जीएम मोहरी विषयीचे गैरसमज दूर होणे गरजेचे

आयसीएआर चे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी नुकतेच जीएम मोहरीच्या विविध मुद्यांवर तपशीलवार निवेदन प्रसारित केले आहे.
Musterd
MusterdAgrowon

पर्यावरण मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जीईएसी) जीएम मोहरीच्या (GM Musterd) डीएमएच-११ (DMH - 11) या  वाणाच्या व्यावसायिक वितरणासाठी मंजुरी दिली.

अशी परवानगी मिळालेले मोहरी हे पहिले मानवी खाद्यातील पीक आहे. मात्र, जीएम पिकांना विरोध करणाऱ्या तज्ज्ञांनी न्यायालयात जाऊन फुलोऱ्यापूर्वीच ही पिके नष्ट करण्याची मागणी केली आहे.

त्यांच्या मते जीएम मोहरी पर्यावरणासाठी हानीकारक आहे. दुसऱ्या बाजूला जीएम पिके ही शेतीचे भविष्य आहेत, असे मानणाऱ्या शास्त्रज्ञांची एक बाजू आहे.  

जीएम पिके अन्नसुरक्षेचा आधार बनू शकतात असे काही जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत  

Musterd
GM Mohari : मोहरी ठरेल मानवी खाद्यातील पहिले जीएम पीक

कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे  महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी नुकतेच जीएम मोहरीच्या विविध मुद्यांवर तपशीलवार निवेदन प्रसारित केले आहे.

जीएम मोहरीला विरोध करणाऱ्यांकडून जीएम मोहरीच्या डीएमएच ११ या वाणाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.

या मोहरीचे अधिकृतपणे आणि योग्य व्यवस्थापन करुन उत्पादन घेतल्यास ते मानवी आरोग्य, प्राणी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का? याबाबत मुल्यांकन केले गेले.  

या मूल्यांकनात आधुनिक आणि आयुर्वेदिक विज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र, कृषी आणि आरोग्य या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या सर्व राष्ट्रीय संस्था आणि सार्वजनिक संशोधन संस्थांचा समावेश होता.

Musterd
GM Mohari : मोहरी ठरेल मानवी खाद्यातील पहिले जीएम पीक

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR)अधिकृत नसलेल्या किंवा माजी कर्मचार्‍यांनी या विषयावर प्रकाशित केलेले कोणतेही मत किंवा लेख हे, पर्यावरण संरक्षण संस्था ई पी ए  (१९८६) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या

नियामक प्राधिकरणांनी दिलेल्या दस्तऐवज आणि निर्णयांपेक्षा वेगळे असल्यास परिषदेकडून त्याला मान्यता दिलेली नाही आणि ते सार्वजनिक हितासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेच्या अधीन आहेत.

हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. हिमांशू पाठक यांनी हे निवेदन प्रसारित केले आहे.

जनुकीय सुधारित वाण काय आहे?

जनुकीय पद्धतीने सुधारित अर्थात जेनेटिकली मॉडिफाईड जीएम तंत्रज्ञानामध्ये दोन भिन्न वाणांमधील अनुकूल जनुक एकत्रित करून जे वाण तयार केले जाते त्याला जनुकीय सुधारित वाण म्हणतात.

हे तंत्रज्ञान मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी देखील सुरक्षित आहे. देशांतर्गत उत्पादन, देशातील खाद्यतेलाची गरज आणि आयातीचे प्रमाण या बाबींचा विचार केला तर जीएम तंत्रज्ञानामध्ये भारतीय कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता आहे.  

खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होणे आवश्यक  

देशांतर्गत तेलाची मागणी लक्षात घेता भारतातील खाद्यतेलाच्या आयातीचे प्रमाण सतत वाढत आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये, पाम, सोयाबीन, सूर्यफूल आणि कॅनोला तेलांची १४.१ दशलक्ष टन आयात केली गेली.

या खाद्यतेलांच्या आयातीवर १,५६,८०० कोटी रुपये खर्च झाले, जे भारताच्या एकूण २१ मेट्रिक टन खाद्यतेलाच्या दोन तृतीयांश वापरा एवढे आहे.

कृषी-आयातीवर खर्च होणारे परकीय चलन कमी करण्यासाठी खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता आवश्यक आहे. या दृष्टीने जीएम मोहरी फायदेशीर आहे.

देशांतर्गत उत्पादनातील तूट आणि आव्हाने 

सोयाबीन, मोहरी, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई,  रामतीळ आणि जवस या तेलबीयांची भारतातील उत्पादकता जागतिक उत्पादकतेपेक्षा खूपच कमी आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये, भारतामध्ये तेलबिया पिकाखाली एकूण २८ .८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र होते.  

यातून ३५.९ दशलक्ष टन उत्पादन मिळाले. भारतातील तेलबियांची उत्पादकता १२५४ किलो प्रति हेक्टर आहे. उत्‍पादकतेचा हा दर जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. एकूण ३५.९ दशलक्ष टन तेलबियांमधून ८ मेट्रिक टन खाद्यतेलाची निर्मिती झाली.

देशाला वर्षभरामध्‍ये लागणा-या २१ मेट्रिक टन एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी फक्त ३५ ते ४० टक्के गरज पूर्ण करते. विशेष म्हणजे खाद्यतेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. एका अंदाजानुसार २०२९-३० पर्यंत २९.०५ दशलक्ष टन  मागणी स्वयंपाकासाठी लागणा-या  तेलाला असणार आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल.

मोहरी हे भारतातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. वर्ष २०२१ -२२ मध्‍ये मोहरीच्या ९.१७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरुन ११.७५ दशलक्ष टन उत्पादन मिळाले.

मात्र,  जागतिक स्तरावरिल उत्पादन सरासरी २००० किलो/हेक्टर आहे. जागतिक उत्पादनाच्या तुलनेत भारतातील मोहरीची उत्पादकता कमी म्हणजे प्रतिहेक्टरी १२८१ किलो आहे.

संकरित वाणाची गरज का आहे?

अनुवांशिकदृष्ट्या सुधारित वाण तयार केल्‍यामुळे विविध बियाणांचा संकर झाल्‍यानंतर वाढीव उत्पन्न  मिळविणे शक्‍य होते. यालाच  संकरित ‘व्हायगॉर हेटेरोसिस’असे म्हणतात.  

संकरित बियाणांचा वापर करून तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. संकरित बियाणे तंत्रज्ञान उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी अतिशय महत्‍वाची भूमिका बजावते, हे अनेक पिकांनी दाखवून दिले आहे.  

देशामध्‍ये  मोहरीची उत्पादकता वाढवण्यासाठीही संकरित बियाणे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

बार्नेस /बारस्टार कार्यप्रणाली  कशासाठी

संकरित बियाण्याच्या उत्पादनासाठी कार्यक्षम, पुनरूत्‍पादन करु शकणा-या बियाणांमध्ये रिस्टोअर सिस्टीम वापरणे आवश्यक आहे. मोहरीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक ‘सायटोप्लाज्मिक’-अनुवांशिक प्रणालीमध्ये काही वातावरणातील बदलामुळे बियाणांचे रिस्टोअर कमी होऊ शकते.

ही एकप्रकारे या प्रणालीची  मर्यादा आहे. कारण यामुळे बियाणाची शुद्धता कमी होते. परिणामी, कृषी मंत्रालयाने कार्यालयीन अधिसूचना क्रमांक १५-१३/२०१४-SD-IV द्वारे  लालमोहरी आणि मोहरीच्या ‘बियाणे कायद्याच्या कलम ६ (९) १९६६, अंतर्गत  संकरित बियाण्यांचे नेहमीचे शुद्धता मानक २०१४ मध्ये ९५ % वरून ८५ % पर्यंत कमी केले.

आनुवांशिकदृष्ट्या सुधारित करण्‍यात आलेल्या बार्नेस/बारस्टार प्रणाली संकरित बियाणे उत्पादनासाठी एक कार्यक्षम आणि मजबूत पर्यायी पद्धत आहे. याच पद्धतीचा वापर  कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अनेक दशकांपासून यशस्वीरित्या करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com