Forest Department : येवला शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना अंदरसूल येथे घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. .अंदरसूल येथील शेतकरी बद्रीनाथ जाधव यांच्या गट क्रमांक ४९६ मधील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. .District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र.विहिरीतून आवाज येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड बचाव पथक आणि राजापूर राऊंडच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. .Solapur District Bank: सोलापूर जिल्हा बँक निवडणूक मतदार यादीवर शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती.पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला कोणतीही दुखापत होऊ न देता सुखरूप बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला निफाड येथे पाठविण्यात आले आहे..या बचाव मोहिमेत राजापूरचे वनपाल तुषार देसाई, येवल्याचे वनरक्षक विशाल बलसाने, वनरक्षक गोपाल राठोड, राजापूरचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, वनमजूर मच्छिंद्र आरकडे, रघुनाथ ठाकरे आणि भाऊसाहेब वाघ यांच्यासह निफाडच्या बचाव पथकाने सहभाग घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.