Mira-Bhayander Municipal Corporation : मिरा-भाईंदर पालिकेच्या खताला शासकीय दर्जा

मिरा भाईंदर महानगरपालिका कचऱ्‍यापासून करत असलेल्या सेंद्रीय खतनिर्मितीला ‘हरित- महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळाला आहे.
Mira Bhayander Municipal Corporation
Mira Bhayander Municipal CorporationAgrowon

Mira-Bhayander Municipal Corporation News : मिरा भाईंदर महानगरपालिका कचऱ्‍यापासून करत असलेल्या सेंद्रीय खतनिर्मितीला (Organic fertilizer production) ‘हरित- महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकडून महापालिकेला हा ब्रँड प्रदान करण्यात आला. या शासकीय ब्रँडमुळे महापालिकेच्या खताला दर्जा प्राप्त झाला आहे.

शहरातून दररोज गोळा होणाऱ्‍या कचऱ्‍यातून महापालिका सेंद्रिय खताची निर्मिती करत आहे. हे खत शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या खताच्या दर्जाचे आहे, असे प्रमाणपत्र महापालिकेने शासकीय खत नियंत्रण प्रयोगशाळेतून मिळवले.

त्यानंतर या खताला हरित-महासिटी कंपोस्ट हा ब्रँड मिळावा, यासाठी फेब्रुवारीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज केला. त्यानुसार महापालिकेला हा ब्रँड मान्य करण्यात आला.

Mira Bhayander Municipal Corporation
Grape Fertilizer Management : द्राक्ष खरडछाटणी काळातील खत व्यवस्थापन

‘हरित-महासिटी कंपोस्ट’ ब्रँड शेतकऱ्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच शेतीसाठी वापरण्यात येत असलेल्या खतांमध्ये हरित ब्रँड असलेल्या खताला मोठी मागणी आहे.

मिरा-भाईंदर शहरातून जमा होणाऱ्‍या कचऱ्‍यावर उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर सौराष्ट्र एन्वायरो या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्‍या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्‍यापासून दररोज सुमारे तीस टन सेंद्रिय खत निर्मिती केली जाते.

मागणी वाढणार

महापालिकेच्या कचरा प्रक्रिया निर्मिती प्रकल्पात तयार होणाऱ्‍या सेंद्रीय खताची कंत्राटदाराकडून विक्री केली जात आहे. या विक्रीतून मिळणारे नव्वद टक्के उत्पन्न कंत्राटदाराला व दहा टक्के उत्पन्न महापालिकेला असा करार करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या उद्यानांसाठी अन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांसाठी हे खत कंत्राटदाराकडून विनामूल्य देण्यात येते. आता महापालिकेच्या खताला हरित - महासिटी कंपोस्ट हा महत्त्वपूर्ण ब्रँड मिळाल्यामुळे खताला मागणी वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com