Nanded News: मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. आवश्यक असलेली कागदपत्रे, डिमांड ड्राफ्टसह परिपूर्ण भरलेले अर्ज १३ फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, यांची नोंद घ्यावी असे कळविले आहे..सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत १३ फेब्रुवारीपर्यंत आहे. जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील..Agriculture Machinery Subsidy : कृषी यंत्रासाठी थेट अनुदान, फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार; कृषिमंत्री चौहान यांनी दिली माहिती.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा, बचत गटाचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असावे, नोंदणीकृत बचत गटामध्ये किमान १० सदस्य असावेत, त्यात ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत, बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत, बचत गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे असणे आवश्यक आहे..स्वयंसाह्यता बचत गटाने राष्ट्रीयीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे, बचत गटाने व गटातील सदस्यांनी यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा, मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा साडेतीन लाख राहील. .Agriculture machinery Subsidy: शेतकऱ्यांना १५ लाख कृषी यंत्रांचे वाटप; आठ वर्षात अनुदान वाढले.स्वयंसाह्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या १० टक्के (३५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट) स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या १० टक्के (कमाल रुपये ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. तालुकानिहाय उद्दिष्ट नुसार कार्यवाही करण्यात येईल. अर्जाची संख्या उद्दिष्ठापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदारांची निवड ही ड्रॉ (लॉटरी) पद्धतीने करण्यात येईल..बचत गटातील किमान एका सदस्यांकडे सदरचे वाहन चालविण्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा परवाना असावा, अथवाप्रशिक्षण घेतले असलेबाबत प्रमाणपत्र असावे. लाभार्थी स्वयंसाह्यता बचत गटांना या योजनेत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा (रुपये ३.१५ लाख) जादाची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी लागेल. प्रस्ताव परिपूर्ण सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांची राहील. असे कळविण्यात आले आहे..पात्रता अटीनोंदणीकृत बचत गट (किमान १० सदस्य)८०% सदस्य अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातीलअध्यक्ष व सचिव अनुसूचित जातीतीलराष्ट्रीयीकृत बँकेत खाते (आधार संलग्न)यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.