Unseasonal Rain : पावसाने कोट्यवधींची हानी

Crop Damage : खानदेशात अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठी पीकहानी झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठी पीकहानी झाली आहे. कोट्यवधींची केळी, कांदा आदी पिके भूईसपाट झाली असून, सुमारे २१ हजार हेक्टरला फटका बसला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांनी तत्काळ भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. धुळे, नंदुरबारात अनेक भागात पिकांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच काही भागात अधिकचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण २१५ गावांमधील २१ हजार ६७ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला.

Crop Damage
Unseasonal Rain : मुसळधार पाऊस अन् गारपिटीने राज्यात रब्बी पिकांना फटका, फळबागांचेही मोठे नुकसान

पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. सोमवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पारोळा तालुक्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी विविध प्रक्षेत्रांत भेटी देऊन पाहणी केली.

मौजे मोंढळे (ता. पारोळा) येथे गारपीट होऊन शेती पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तालुक्यात पीकहानीच्या पाहणीप्रसंगी दिले आहेत. पंचनामे काही भागात लांबले आहेत. कारण मनुष्यबळ कमी आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

तर काही भागात पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल तालुका प्रशासनाकडे बुधवारी (ता.२८) प्राप्तही झाले. हे अहवाल अंतिम करून जिल्हा प्रशासनाकडे पोचतील. जिल्हा प्रशासन आपला अहवाल नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे सादर करतील, अशी माहिती मिळाली.

तालुकानिहाय झालेले नुकसान

तालुका हेक्टर

चाळीसगाव ३५९३

भडगाव ९२३१

अमळनेर ३३९०

पारोळा ६३७५

धरणगाव १३५

चोपडा ४९९०.२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com