Milk Subsidy : शासनानं जाहीर केलं मात्र दूध अनुदान मिळालचं नाही; धाराशीवमध्ये दूध रस्त्यावर ओतून संताप

Dharashiv Farmers Milk Subsidy Issue : राज्यात शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकारकडून सुरूच असून अद्याप धाराशीवमधील शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळालेले नाही.
Milk Subsidy
Milk SubsidyAgrowon

Pune News : राज्यात बळीराज्याच्या कोणत्याच उत्पादनाला सध्या बाजारात म्हणावे तसा दर मिळताना दिसत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यादरम्यान दुधाचे दर देखील पडल्याने बुडत्याला मिळणारा काडीचा आधार देखील सरकारच्या दुर्लक्षामुळे नाहीसा होताना दिसत आहे. तर एकीकडे दुधाचे पडणारे भाव, नसणारा चारा पाणी आणि न मिळालेल्या दूधाच्या अनुदानावरून धाराशीवमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून बुधवारी (ता.२२) सरकारचा निषेध करताना रस्त्यावर दूध ओतले आहे. यामुळे धाराशीव जिल्ह्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष दिसत असून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून सतत दुधाचे भाव पडत असल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशान्यावर घेत टीका केली होती. तसेच अधिवेशनात दुधाला अनुदान देण्याची मागणी केली होती. तेव्हा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दुधाला ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.

Milk Subsidy
Cow Milk Subsidy : गायीच्या दूध अनुदानासाठी माहिती भरण्याची पुन्हा तारीख वाढवली, वंचित शेतकऱ्यांना दिलासा

यानंतर पुलाखालून खूप पाणी गेले असून अद्याप धाराशीव जिल्ह्यातील शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. यावरून शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतुन शासनाचा निषेध नोंदवला. तसेच सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Milk Subsidy
Milk Subsidy : दूध अनुदानाचे आतापर्यंत १७६ कोटींवर वितरण

नेमकं काय झाले?

धाराशीव जिल्ह्यातील जुनोनी गावातील दुध डेअरीकडे शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध जाते. मात्र दूध डेअरी चालकाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती असणारी कागदपत्रे शासनाकडे वळती केली नाहीत. यामुळे दूध अनुदानाचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नव्हता. याबाबत वारंवार मागणीकरूनही शासकीय अनुदान मिळाले नाही. यामुळे अनुदान कधी मिळणार? असा सवाल करत दुध डेअरीसमोरच दूध ओतून शेतकऱ्यांनी निषेध केला.

दरम्यान राज्याच्या विविध भागात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत असून धाराशीवमध्ये मात्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यातूनच जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना सतातवत आहे. दूधाला देखील कमी भाव मिळत असल्याने आता शेतकरी आक्रमक होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com