Sharad Pawar : दूधदरवाढीची तातडीने अंमलबजावणी करावी ; शरद पवार यांचे राज्य सरकारला आवाहन

Milk rate : राज्य सरकारने हस्तक्षेप करून दूध दरवाढीची तातडीने अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 
कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 
Published on
Updated on

Milk Rate Protest : ‘‘गेले काही दिवस दूध दारावरून सुरू असलेल्या दुग्ध उत्पादकांच्या आंदोलनात राज्य सरकारने हस्तक्षेप करून दूध दरवाढीची तातडीने अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २८) केली. त्याचबरोबर दूध संघानेही त्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली.

कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 
Milk Rate : दूध दराचे उपोषण स्थगित; आंदोलन सुरू राहणार: डॉ. अजित नवले

गेल्या काही दिवसांपासून दूधदरप्रश्‍नी डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनाने १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर निश्‍चित केले आहेत. मात्र या आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नसल्याने यासंदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. उपोषणकर्ते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनीही उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 
Milk Rate  : दूध उत्पादकांचं आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच; सरकार दखलही घेईना 

‘‘शासनाबरोबर चर्चेतून मार्ग काढता येणे शक्य आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी दुधासारखा नाशिवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करावी’’, असे श्री. पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्या संदीप दराडे, डॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ‘दुधाचा विषय हा गरीब माणसाच्या अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. २५ ते २८ रुपये लिटरने गायीचे दूध विकणे शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. शासनाने या विषयावर सामोपचाराने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. दूधदराच्या प्रश्‍नावर सरकारी हस्तक्षेपाची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना किमान ३४ रुपये लिटरप्रमाणे दुधाचा भाव मिळण्यासाठी गरज पडल्यास सरकारने मदत करावी,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com