Laal Bavta Union : मनरेगा, गायरान जमिनीच्या मुद्द्यावर संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार ; लाल बावटा शेतमजूर युनियनच राज्य अधिवेशनाचा समारोप

Mahatma Gandhi NREGA : मनरेगा, गायरान जमीन, किमान वेतन आदी मुद्द्यावर संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या अधिवेशनात करण्यात आला.
Laal Bavta Union
Laal Bavta UnionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनाचा रविवारी (ता. ८) उत्साहात समारोप करण्यात आला. मनरेगा, गायरान जमीन, किमान वेतन आदी मुद्द्यावर संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.

समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो व‌ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य अमरावतीचे कॉ. तुकाराम भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉ. कानगो म्हणाले, की रोजगार हमीची योजना बासनात गुंडाळणाऱ्या, गायरान व वन जमिनीवर अतिक्रमण करून उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहिनांना जमिनीतून हुसकावून लावण्याचे षड्यंत्र उधळून लावले पाहिजे, असे आवाहन ही यांनी केले.

कॉ. भस्मे म्हणाले, की जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या सरकारला ग्रामीण कष्टकऱ्यांनी सत्तेतून खाली खेचावे, असे ते म्हणाले. तीन वर्षासाठी ९ पदाधिकाऱ्यांसह ४१ जणांची राज्य कमिटी निवडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांचे प्रतिनिधी या राज्य कमिटीवर निवडण्यात आले आहेत. यावेळी बीडचे कॉ. नामदेव चव्हाण यांची राज्य अध्यक्षपदी तर भंडाराचे कॉ. शिवकुमार गणवीर यांची राज्य सरचिटणीसपदी फेर निवड करण्यात आली आहे.

राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे कॉ.कॉ.राम बाहेती यांची एक मताने निवड कर करण्यात आली. या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तीन उपाध्यक्ष आणि तीन सहसचिव यांचीही निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षामध्ये गोंदियाचे हौसलाल रहांगडाले, नंदुरबारचे ईश्वर पाटील व अमरावतीचे संजय मंडवधरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तीन सह सचिवांमध्ये गोंदियाच्या कल्पना डोंगरे, औरंगाबादचे कॉ. गणेश कसबे, सांगलीचे कॉ. विजय बचाटे यांचा समावेश करण्यात आला आहे. ४१ जणांच्या राज्य कमिटी सदस्यांपैकी दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com