Pune News: मुंबईतील आझाद मैदानावर मनरेगा (व्हीबी-जी राम-जी) योजनेतील कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आठवड्याभरापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या ठिय्या आंदोलनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत नियमित करणे, वेळेवर बिले , महिलांना प्रसूती रजा देणे, बोगस भरती रद्द करणे आणि आरोग्य विमा अशा प्रमुख मागण्या आहेत. यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने सांगितले आहे..भविष्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष…एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहा. कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेचे कर्मचारी मंत्रालयापासून जिल्हा, तालुका आणि गावपातळीपर्यंत विविध कार्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मनरेगा योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे होण्यासाठी त्यांचे योगदान असूनही त्यांच्या भविष्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे..NABARD Employee Protest: ‘नाबार्ड’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन.मनरेगा कंत्राटी कर्मचारी संघटनेने यापूर्वीही शासन आणि रोहयो विभागाकडे अनेक वेळा निवेदने व नोटीसा दिल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळत नाहीत, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मिळत नाही आणि अनेकांना सेवेत नियमितही केले जात नाही. या सर्व कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. म्हणूनच या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.ज्ञानेश्वर जाधव (जिल्हा अध्यक्ष - क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेट, धाराशिव ).संघटनेच्या प्रमुख मागण्या…शासनाने बिले वेळेत मंजूर करावीत.मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या योजनेतील ईतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित करावे. तसेच, एस-२ इन्फोटेक या कंपनीमार्फत होत असलेली भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी.राज्य निधी असोसिएशनमार्फत भरती करावी. .Employee Protest: बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन.“समान काम, समान वेतन” धोरण लागू करावे.कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढावा आणि प्रसूती रजा द्यावी.मनरेगा विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून प्रत्येक पदाची स्पष्ट रचना ठरवावी..दरम्यान, शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संघटनेने २३ जानेवारी पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. ह्या आंदोलनाच्या मागे कोणताही राजकीय हेतू नसून, केवळ आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.