Maharashtra Drought Condition : मुंबईसह ११ जिल्ह्यांत पाणीबाणी, हवामान खात्याची आकडेवारी जाहीर

Solapur Latur Rain : सर्वाधिक पाऊस अवर्षणग्रस्त जिल्हे असलेल्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत झाला आहे.
Maharashtra Drought Condition
Maharashtra Drought Conditionagrowon

Maharashtra Rain Update : यंदाचा जून महिना संपत आला तरी पावसाने म्हणावी तशी साथ न दिल्याने पिकांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यातच मुंबई शहरासह ११ जिल्ह्यांच्या घशाला कोरड पडल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात मागच्या वर्षी अल् निनोच्या प्रभावामुळे अत्यल्प पावसाची नोंद झाली.

अनेक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने ४० तालुक्यासह अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला होता. जून संपत आला तरी पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसह ११ जिल्ह्यांच्या घशाला कोरड पडली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूर येथे जूनमध्ये आतापर्यंत तेथील सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

राज्यात १ ते २४ जून या दरम्यान सरासरी १५०.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी आतापर्यंत १५८.८ म्हणजे सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे. त्यापैकी सर्वाधिक पाऊस अवर्षणग्रस्त जिल्हे असलेल्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत झाला आहे.

सोलापूर येथे २३ जूनपर्यंत सरासरी ८५.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला होता. यावर्षी सरासरीपेक्षा १४० टक्के जास्त म्हणजे २०४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. लातूरमध्ये या दरम्यान १०९.७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा २२६.५(१०६ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Maharashtra Drought Condition
Kolhapur Sangli Flood : धास्ती महापुराची! जागतिक बँकेच्या पथकाची आपत्ती व्यवस्थापन विभागाला अचानक भेट, अधिकाऱ्यांकडून सूचना

कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली तरीही मुंबई, मुंबई उपनगरांसह नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरू होऊनही सरासरी इतकाही पाऊस नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.

हवामान खात्याच्या मध्य महाराष्ट्र या हवामान उपविभागातील पुणे, नाशिक आणि सातारा तसेच, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. तर, धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशीम, जालना, परभणी, बीड, नगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com