Government Scheme : शासकीय योजनांचा आदिवासींना लाभ

Tribal Empowerment : आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान’ सुरू आहे.
Tribal Empowerment
Tribal EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Thane News : आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान’ सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील १४६ गावांमध्ये रविवारी (ता.१५) अभियानाला सुरूवात झाली.

देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ आदिवासी गावे या अभियानात सहभागी होणार आहेत. याअंतर्गत राज्यामधील ३२ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत जनजागृतीसह शिबिर होणार आहे. त्याद्वारे गावपातळीवर विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे.

Tribal Empowerment
Tribal Development : ‘आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे’

केंद्र सरकारने जनजातीय गौरव वर्ष २०२५ चे औचित्य साधून प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान अंतर्गत जनजागृतीपर मोहिमेची अंमलबजावणी गावपातळीवर होणार आहे.

Tribal Empowerment
Tribal Development : ‘शबरी’च्या प्रशिक्षणार्थींना ‘आरसेटी’चे बळ

या उपक्रमात आधार, रेशन, किसान, आयुष्मान भारत कार्ड, जातप्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,पीएम-किसान,जनधन खाते, पीएम -किसान सन्मान निधी, एफआरए वनपट्टे वाटप, पीएम मातृवंदना योजना, पीएम-उज्ज्वला योजनांटा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांचा समावेश

ठाणे जिल्ह्यालगतच्या पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये या अभियानाअंतर्गत विशेष शिबिरे होणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत पालघर आदिवासी गावांची संख्या अधिक असल्याने ही मोहीम एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com