ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. ए. व्ही. गजाकोस, डॉ. डी. एस. कराळेमजूरटंचाईच्या काळात शेतकऱ्यांसमोर यांत्रिकीकरण हाच उत्तम पर्याय आहे. त्याला शासनाकडून प्रोत्साहनही दिले जात असून, विविध योजनांमधून यंत्रे व अवजारे यासाठी अनुदान दिले जात आहे. पण अनेक शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार यांची निवड कशी करावी, यामध्ये अडचणी येताना दिसत आहेत. कोणते यंत्र, अजार कोणत्या शेतकऱ्यासाठी फायद्याचे ठरू शकते, हे पाहू. यंत्रे किंवा अवजारांची निवड कशी करायची याची माहिती आपण या सदरातून घेणार आहोत. .सध्या महाराष्ट्रात मका लागवडीखालील क्षेत्र अंदाजे १० ते ११ लाख हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मका हे खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. मका हे तुलनेने कमी कालावधीत तयार होणारे, मानव, पशुपक्षी आहारासोबतच इंधन निर्मितीसारख्या विविध बाबींसाठी उपयुक्त पीक असल्याने मागणी सातत्याने वाढत आहे. मक्याचे दर तुलनेने स्थिर राहून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळते..Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणाचे प्रभावी आधारस्तंभ.मका पिकातील लागवड, आंतरमशागत, खते देणे, कीडरोग नियंत्रणासाठी किंवा तण नियंत्रणासाठी फवारणी, काढणी व काढणीपश्चात मळणी, सोलणी अशा सर्व कामांमध्ये यांत्रिकीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध प्रकारची मनुष्यचलित, बैलचलित, ट्रॅक्टर आणि स्वयंचलित सुधारित यंत्रे व अवजारे उपलब्ध होत आहेत. त्यांचा वापर करून कमी मनुष्यबळात व कष्टात अधिक काम शक्य होते. या लेखात मका व अन्य धान्यांच्या पेरणीसाठी उपयुक्त यंत्र अवजारांची माहिती घेऊ..योग्य पेरणी यंत्रांने केलेल्या पेरणीमुळे बियाण्याचे समान अंतर, खोली व ओळींचे नियोजन निश्चित होते. सध्या सीड ड्रील्स, मका प्लांटर्स, बीबीएफ प्लांटर्स, आणि न्यूमॅटिक प्रिसिजन प्लांटर अशा आधुनिक पेरणी यंत्रांचा वापर मका पेरणीसाठी करणे शक्य आहे. त्यातील आपल्या गरजेनुसार कोणते यंत्र निवडायचे, हे पाहू..Agriculture Mechanization: कृषी यांत्रिकीकरणासाठी २७.३७ कोटींचे अनुदान वितरित.मनुष्यचलित पेरणी (टोकण) यंत्रज्यांच्याकडे मका, गहू, तीळ, जवस, सोयाबीन, तूर, हरभरा अशा पिकांची कमी क्षेत्रावर लागवड असते, त्यांनी या मनुष्यचलित पेरणी (टोकण) यंत्राची निवड करावी. यामुळे एका ओळीमध्ये बियांची व खताची पेरणी एकाच वेळी व अचूक अंतरावर, २ ते ४ सें.मी. खोलीवर होते. त्यामुळे खते व बियाणे यांची बचत होते. उगवण चांगली होते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर आवश्यकतेनुसार स्वतः निश्चित करावे लागते. विविध पिकांच्या पेरणीकरिता चकत्या (प्लेट) दिलेल्या असतात. त्यामुळे शिफारशीनुसार दोन बियांतील अंतर समान ठेवले जाते..बैलचलित पेरणी यंत्रलहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी बैलचलित पेरणी यंत्र हे एक महत्त्वाचे कृषी अवजार आहे. पारंपरिक हाताने पेरणीच्या तुलनेत यामुळे अचूकता वाढते. बियाण्याची बचत होते. मजुरी खर्च कमी करते. कोरडवाहू तसेच कमी भांडवल असलेल्या शेतीसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. त्याद्वारे ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, मूग, उडीद, भुईमूग व इतर कडधान्ये यांची पेरणी शक्य होते.बैलांच्या साहाय्याने ओढले जाणारे हे यंत्र हे तीन फाळी आहे. या फाळातील अंतर कमी जास्त करता येते. पुढील भागातील फणी मातीमध्ये ठराविक खोलीचे चर काढतात. त्याच वेळी बियाणे आणि खत पेटीतून ठराविक प्रमाणात बियाणे व खत नळीतून खाली सोडले जाते. यंत्राच्या मागील भागातील झाकण यंत्रणा त्या बियाण्यावर माती टाकून योग्यरीत्या झाकते..Agricultural Mechanization: अकोला जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनांना वेग.रचना व मुख्य भागफ्रेम ः यंत्राच्या सर्व भागांना आधार देणारी मजबूत रचना.बियाणे पेटी ः पेरणीसाठी आवश्यक बियाणे ठेवण्यासाठी.खत पेटी ः पेरणीसाठी आवश्यक खत ठेवण्यासाठी.बियाणे प्लेट यंत्रणा ः ठराविक प्रमाणात बियाणे पडण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा.बियाणे नळी ः बियाणे पेटीतून बियाणे फणामध्ये पोचविण्यासाठी.माती झाकण यंत्रणा ः पेरलेले बियाणे मातीने झाकण्यासाठी.जोडणी दांडा ः बैलांना यंत्राशी जोडण्यासाठी..शून्य मशागत पेरणी यंत्रजमिनीच्या सुपीकतेसह अन्य फायदे मिळविण्यासाठी शून्य मशागत यंत्रांचा वापर वाढत आहे. या पद्धतीमध्ये जमिनीची कोणतीही मशागत केली जात नाही. अशा स्थितीमध्ये पेरणी करण्यासाठी शून्य मशागत पेरणी यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे बी योग्य खोलीवर आणि समान अंतरावर पेरले जाते. यात मातीची संरचना टिकून राहते. ओलावा जास्त काळ टिकतो. शून्य मशागत यंत्रामुळे पेरणीचे काम जलद तर होतेच, पण शेतकऱ्यांचे पैसे, श्रम आणि वेळ वाचतो. हे यंत्र ९, ११ आणि १३ दात्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे दोन ओळीतील अंतर व दोन बियाण्यातील अंतर समान ठेवता येते. बियाण्याची पेरणी २ ते ४ से.मी. खोल पडेल, या बेताने करावी. याची रचना पेरणी यंत्रासारखी असून पेरणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था आहे..Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणामुळे भारतीय शेतीचे चित्र बदलेल?.शून्य मशागत यंत्राची रचनासदर यंत्र हे ट्रॅक्टरचलित असून याकरिता ३५, ४५ ते ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आवश्यक असतो. आपल्याकडे यापैकी जो ट्रॅक्टर उपलब्ध आहे, त्यानुसार यंत्राची नोंदणी करावी.या यंत्रात ९, ११ आणि १३ दाते असलेले यंत्र उपलब्ध आहे. या दात्यामधील अंतर आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. यामुळे दोन ओळीमधील अंतर समान ठेवले जाते. याचे फाळ तीक्ष्ण असून जमीन सहजपणे फोडत जातात. २. या यंत्रामध्ये बियाणे आणि खताची पेटी विविध कप्प्यासह उपलब्ध आहे. या यंत्रासोबत सोयाबीन, हरभरा, मका, तूर, कापूस अशा महाराष्ट्रातील आवश्यक त्या पिकानुसार प्लेट (चकत्या) दिल्या जातात. त्याद्वारे एक वेळेला दोन किवा तीन दाणे एक वेळी जमिनीत पेरली जातात..बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याकरिता यंत्राच्या डावीकडे लोखंडी पट्टी दिली आहे. त्याद्वारे शिफारशीप्रमाणे बियाण्याचे प्रमाण कमी जास्त करता येते.खताची पेटीमध्ये विविध कप्पे दिलेले आहे. त्यांचेही प्रमाण दिलेल्या हँडलने कमी जास्त करून शिफारशीप्रमाणे खते देता येतात.या यंत्रामध्ये बियाणे विशिष्ट खोलीवर पेरले जावे, यासाठी खोली चक्र (Depth Wheel) दिले आहे. या चक्रामुळे बियाणे जमिनीत समान खोलीवर सोडले जाते. यांची खोली आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येते..शून्य मशागत पेरणी यंत्राचे फायदेमातीची संरचना टिकते ः माती जास्त फोडली जात नाही.त्यामुळे तिची नैसर्गिक संरचना आणि सूक्ष्मजीव सृष्टी सुरक्षित राहते.ओलावा टिकतो ः मातीवर जास्त खड्डे न पडल्यामुळे पर्जन्यमानाचा ओलावा मातीमध्ये जास्त काळ टिकतो.कमी मेहनत आणि वेळ ः पारंपरिक पेरणीपेक्षा हे यंत्र जलद काम करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा श्रम आणि वेळ वाचतो..उत्पादकता वाढवते ः बीज योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरले जाते. परिणामी मका किंवा इतर धान्य पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन प्रमाण सुधारते.कमी इंधन खर्च ः शेताची मशागत व अन्य कामे केली जात नसल्याने ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रांच्या भाडे व इंधन खर्चात बचत होते.पर्यावरणपूरक ः मातीच्या संरचनेमध्ये फारशी ढवळाढवळ केली जात नसल्यामुळे ही पद्धत सर्वात पर्यावरणपूरक मानली जाते.पुढील भागात बीबीएफ प्लांटर आणि न्यूमॅटिक प्लांटरविषयी माहिती घेऊ.- ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२०कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.