Grape Harvesting : द्राक्ष बागेत एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना

द्राक्षाच्या वार्षिक उत्पादन चक्रामध्ये दोन टप्पे येतात. त्यातील मूलभूत आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे खरड छाटणी. सध्या या छाटणीचा हंगाम चालू आहे. खरड छाटणीनंतर येणाऱ्या एकसारख्या फुटी पुढे द्राक्षाची प्रत आणि उत्तम दर यासाठी महत्त्वाच्या असतात. द्राक्ष बागेत एकसारख्या फुटी निघण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
Grape Harvesting
Grape HarvestingAgrowon

डॉ. स. द. रामटेके, अमृता लंगोटे

Grape Season : द्राक्ष वेलींवर पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा एक प्रकारचा ताण असतो. तो तसाच असतानाच खरडछाटणी केल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याच प्रमाणे या काळात तापमानही वाढलेले असते. त्यामुळे वेळी अंतर्गत चयापचय क्रियेचा वेग मंदावतो.

तापमान खूपच जास्त राहणे आणि पाण्याची कमतरता या दोन घटकांमुळे नवीन फुटी जळण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये एकसारख्या फुटी निघण्यासाठीचे घटक पुढील प्रमाणे असतात.

१) तापमान, २) पाणी, ३) वेलीवरील ताण, ४) वेलीची विश्रांती, ५) आर्द्रता, ६) वेलीतील अन्नद्रव्यांची साठवणूक, ७) शेडनेटचा वापर, ८) मल्चिंगचे नियोजन इ.

उपाययोजना -

१) एकसारखी फूट निघण्यासाठी हायड्रोजन सायनामाइड २० ते ३० मि.लि प्रतिलिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे. हे पेस्टिंग तापमान कमी झाल्यानंतरच करावे. अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्यता असते. यापेक्षा जास्त प्रमाणात पेस्टिंगची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवावे.

२) तापमान कमी असणे गरजेचे आहे साधारणतः ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हानिकारक समजले जाते. बऱ्याच बागायतदारांनी तापमानापासून बागेच्या बचावासाठी शेडनेट अथवा कापडाचा वापर द्राक्ष बागेत केला आहे.

शेडनेट फळछाटणीच्या वेळेस बागेवर टाकले असल्यास ते लवकर काढू नये. कारण शेडनेटमधील वेलींना एकसारख्या आणि लवकर फुटी निघत असल्याचे आढळले आहे. सावलीतील फुटी कमीत कमी सात ते आठ दिवस लवकर फुटतात.

Grape Harvesting
Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

३) द्राक्ष बागेतील पाण्याचा ताण पडू देऊ नये. या दिवसात उन्हाळा असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे. मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वाफसा राहील याची काळजी घ्यावी. छाटणीनंतर ८ ते १० दिवसांनी रोज सकाळी व संध्याकाळी पाण्याची फवारणी सुरू करावी. त्यामुळे ओलांड्यांवर आर्द्रता निर्माण होईल. एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.

४) क्षारांच्या सानिध्यात पांढऱ्या मुळीची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर ५० किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचरा करून घ्यावा. त्याचा पांढऱ्या मुळांच्या वाढीसह फुटीवरदेखील चांगला परिणाम होतो.

५) खरड छाटणीच्या आधी मशागतीची कामे पूर्ण करावीत. त्यात प्रामुख्याने बोद आणि खतांचे नियोजन यांचा समावेश होतो.

अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यास खरड छाटणी उशिरा होऊनही येणाऱ्या समस्यांवर मात करता येऊ शकते.

संपर्क - डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६ - (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com