Grape Crop in Flood: अतिवृष्टीने निम्मा महाराष्ट्र झोडपून निघाला आहे. यात अनेक फळपिकांवर अनिष्ट परिणाम दिसत आहेत. नाशिक भागातील मुख्य फळपीक द्राक्ष असून या भागातील द्राक्षाच्या बागेत पाणी साचल्यामुळे आणि वेली सुकल्यामुळे चिंतेचं वातावरण झालेले आहे. अशा अवस्थेत वेळीच एकात्मिक उपाययोजना राबावल्यास शेतकरी द्राक्षाचे उत्पादन टिकवू शकतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषिदर्शनीमध्ये या उपाययोजना दिलेल्या आहेत..पारंपरिक उपायफळबागेत साठलेले पाणी काढून टाकावे. त्यासाठी उताराच्या दिशेने चर काढावा. नविन लागवड केलेल्या रोपांच्या आळ्यातील पाणी काढून रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. बागेतील रोगग्रस्त पाने, घड, फांदयाकाढून नष्ट कराव्यात. बागेतील तसेच बांधावरील गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी..Grape Pruning : द्राक्ष छाटणी १०-१५ दिवस पडणार लांबणीवर.यांत्रिक उपायद्राक्षावरील खोड किडीचे प्रौढ अवस्था आकर्षित करण्यासाठी बागेमध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सायंकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत प्रकाश सापळे सुरु ठेवावेत व नंतर खोड किडीचे प्रौढ गोळा करून नष्ट करावे. .जैविक उपायअतिवृष्टीनंतर बऱ्याचदा द्राक्षावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यातील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी लेक्यानिसिलीम लेक्यानी (१x१०० सीएफयू प्रति १ ग्रॅम) म्हणजेच ५० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात..रोग नियंत्रण वारंवार एकाच प्रकारची बुरशीनाशके न वापरता आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके आळीपाळीने अथवा एकत्रित वापरावेत. त्यासाठी मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब ०.२% किंवा सायमोक्झॅनिल ०.५% किंवा मॅन्कोझेब ०.२% किंवा डायमिथोमॉर्फ ०.१% किंवा फॉस्फोरिक अॅसिड ०.४% या बुरशीनाशकांची फवारणी करावी. बुरशीनाशके, किटकनाशकांची फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. ही फवारणी करताना दररोजचे वातावरण बघून २ ते ३ दिवसांनी आलटून पालटून फवारणी करावी..गोगलगाय नियंत्रणपावसानंतर द्राक्षाच्या बागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी खालील एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. गोगलगायींना लपण्याची ठिकाणे जसे गवत, छाटणीनंतरच्या काड्या, दगड हे काढून टाकावे. बागेमध्ये वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग, ७ ते ८ मीटर अंतरावर संध्याकाळी ठेवावेत आणि त्याखाली गोळा झालेल्या व बागेतील गोगलगायी आणि त्यांची अंडी दुसऱ्या दिवशी सकाळी गोळा करून साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट करावीत..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. अतिवृष्टीनंतर द्राक्ष बागेत सर्वप्रथम काय करावे? शेतातील साचलेले पाणी बाहेर काढून बाग स्वच्छ करावी.२. द्राक्षावर खोड किडीचे नियंत्रण कसे करावे? प्रकाश सापळे वापरून प्रौढ किडी गोळा करून नष्ट कराव्यात.३. पिठ्या ढेकणाचे नियंत्रण कशाने करतात? लेक्यानिसिलीम लेक्यानी ५० ग्रॅम/१० लि. पाणी या प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात.४. अतिवृष्टीनंतर कोणती बुरशीनाशके फवारावी? मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब, सायमोक्झॅनिल, डायमिथोमॉर्फ किंवा फॉस्फोरिक अॅसिड आळीपाळीने वापरावीत.५. शंखी गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे? गवत, दगड, अवशेष काढून टाकावे व गोळा झालेल्या गोगलगायी साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.