Smart Farming : नाशिक शेतीला पशुपालनाची जोड दिल्यास शेतकऱ्यांना वर्षभराचा शाश्वत उत्पन्न स्रोत निर्माण करता येतो. त्यामुळे पशुपालकांनी आधुनिक खाद्य व्यवस्थापन, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि स्वच्छ दुग्ध उत्पादनाचे तंत्र आत्मसात करून पशुपालनातून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले..केंद्रीय गो अनुसंधान केंद्र (मेरठ), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर) आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये पशुपालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. विद्यापीठातील तज्ज्ञांचे ज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या विस्तार उपक्रमाचा हा भाग असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. .Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न शक्य : प्रा. कुलकर्णी.माफसूच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ‘खाद्य व्यवस्थापन’ आणि ‘खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान’ या पुस्तिकांचे प्रकाशन डॉ. पाटील आणि केंद्रीय देशी गाय संशोधन केंद्र, मेरठचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. संजय कुमार वर्मा यांच्या हस्ते झाले. अनुसूचित जाती प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुपालकांना दुधाच्या किटल्या तसेच शेळ्यांचे वजन करण्यासाठी पोर्टेबल वजनकाटे देण्यात आले..Smart Veterinary Hospital: सांगली जिल्ह्यात पशुधनासाठी स्मार्ट दवाखान्याचा विचार करु : पालकमंत्री चंद्रकांत पाटील .डॉ. वर्मा यांनी पशुधनासाठी पूरक आहार घरच्या घरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. माफसूचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांनी विद्यापीठातील संशोधनाचा पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयोग होत असल्याचे सांगितले..डॉ. संतोष शिंदे यांना ‘माफसू मित्र’मुख्यमंत्री पशुधन योजनेचे राज्य समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष शिंदे यांनी आगामी शासकीय योजनांची माहिती दिली. पशुपालकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत माफसूच्या वतीने त्यांना ‘पहिला माफसू मित्र’ हा सन्मान देण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.