Gadchiroli Rice Scam : धान्य खरेदी, साठवण घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई

Grain Procurement Scam : अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले असून, २२.४२ लाखांची वसुली सुरू आहे.
Rice Procurement
Rice Procurement Agrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : जिल्ह्यातील तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये झालेल्या विविध अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांत अनेक कारवाया करण्यात आल्या असून, दोषींवर निलंबन, विभागीय चौकशी, वसुली आणि गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले असून, २२.४२ लाखांची वसुली सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

Rice Procurement
Illegal Grain Procurement : अवैध धान्य खेडा खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार

सिरोंचा येथील २०११ सालच्या धान्य अपहारप्रकरणी २४.८ लाखांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच आदिवासी विकास संस्था, देऊलगाव (ता. कुरखेडा) येथे २०२३-२४ मध्ये ३९०० क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून, १.५३ कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rice Procurement
Midday Meal : पोषण आहारासाठीचे धान्य थेट शेतकऱ्यांकडून व्हावे खरेदी

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्यसाठ्याची १०० टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. २ एप्रिल रोजी झालेल्या पॅडी होर्डिंग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

२०११ मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या २.६७ कोटी रुपयांच्या दंडापैकी १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित ७२ लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या १३ राइस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com