Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे १६५ कोटी लुटले, पुरुष आणि शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश; मंत्री तटकरे
Ladki Bahin Scheme Misuse: राज्याच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना मिळाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हे मान्य केले.