Kharif Sowing: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत ४२ लाख ७३ हजार ४६८ हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण सर्वसाधारण क्षेत्राच्या ८६ टक्के असून, गतवर्षी याच कालावधीतील पेरणीच्या तुलनेत ९० टक्के आहे..यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाची अनिश्चितता कायम असल्याने पेरणीचा कालावधी वाढला आहे. अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक टप्प्यांत पेरणी करण्यात आली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी पेरणी हिंगोली जिल्ह्यात, तर सर्वाधिक पेरणी नांदेड जिल्ह्यात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते..Marathwada Sowing Update: मराठवाड्यात ४० लाख ५६ हजार हेक्टरवर पेरणी.छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांचे खरीप पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख ४२ हजार २४ हेक्टर असून, त्यापैकी १८ लाख ६४ हजार ८२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सर्वसाधारण क्षेत्राच्या ८७ टक्के आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत २० लाख ४८ हजार ४५४ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदाची पेरणी ९१ टक्के आहे..Kharif Season: नांदेडला साडेसहा लाख हेक्टरवरील पेरणी धोक्यात.लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांचे खरीप पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र २८ लाख ३० हजार ७०५ हेक्टर असून, आतापर्यंत २४ लाख ८ हजार ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सर्वसाधारण क्षेत्राच्या ८५ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत २७ लाख ३३१ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदाची पेरणी ८९ टक्के इतकी आहे..जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर : ६,०६,०२२जालना : ५,५१,३५३बीड : ७,०७,४५२लातूर : ४,४८,२४६धाराशिव : ४,६२,९८१नांदेड : ७,२३,६८६परभणी : ४,४१,९९१हिंगोली : ३,३१,७३७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.