Village Tourism: शेतकऱ्यांना कृषी व्यावसायासोबतच उत्पन्नाचा अधिकचा स्रोत म्हणून कृषी पर्यटन संस्कृती उपयुक्त ठरत आहे. राज्य पर्यटन संचालनालयाकडे मराठवाड्यातील १५० शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्याची नोंद केली आहे. विविध पर्यटन मार्गांवर सुरू असलेल्या या कृषी पर्यटन केंद्रांची राज्य पर्यटन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून नियमित वेळोवेळी पाहणी केली जाते. त्यातून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला जातो. आतापर्यंत मार्चअखेर छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदणी केलेल्या ११६ केंद्रांची पाहणी केली. त्यातील ९५ केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र दिले. .देश-विदेशातील शहरांतून येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता यावे, तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, या हेतूने राज्याच्या पर्यटन संचालनालयांतर्गत पर्यटन मार्गांवर जागोजागी कृषी पर्यटन केंद्र स्थापन केले जातात. यासाठी शेतकऱ्यांना दर पाच वर्षांनी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयांकडे नोंदणी करावी लागते. नंतर संबंधित शेकऱ्यांस कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाते. वेळोवेळी नियमित येथील सुविधा व नावीन्यपूर्ण बाबींचा आढावा घेतला जातो..Agri Tourism: कृषी पर्यटनाला मिळतेय बळ.छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण १५० शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्रासाठी नोंदणी केली. उपसंचालक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मार्चअखेर ११६ केंद्रांची पाहणी करत त्यातील ९५ केंद्रांना प्रमाणपत्र दिले. तर २० जणांचे अर्ज नाकारले, अशी माहिती पर्यटन सहायक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दिली..Agri Tourism : फळबाग, बांबू वनातील आनंदवन.कृषी पर्यटन केंद्राचे फायदेपर्यटन मार्गांवर कृषी पर्यटन केंद्र शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे. यामुळे शेतीव्यवसायाला चालना, तसेच ग्रामीणमध्ये रोजगारनिर्मिती होते. दुसरीकडे पर्यटनादरम्यान, या केंद्रांवर पर्यटकांना मानसिक शांतता आणि रिलॅक्सेशन मिळते. तसेच ग्रामीण जीवन व शेतीचा नवीन अनुभव आणि ज्ञान, नैसर्गिक जीवनशैलीचा आनंद मिळतो..जिल्हानिहाय कृषी पर्यटन केंद्र किती?छत्रपती संभाजीनगर ७२, जालना १७, परभणी ६, हिंगोली ३, नांदेड ७, लातूर ५, धाराशिव २, बीड ४. पर्यटन मार्गावरील एक एकर शेतजमीन असलेला कुणीही शेतकरी या केंद्रासाठी पर्यटन संचालनालयाकडे अर्ज करू शकतो. यासाठी www.maharashtratourism.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करता येईल, असे आवाहन उपसंचालक विजय जाधव यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.