Mumbai News: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २७) मुंबईच्या दिशेने कूच करीत आहेत. काही बांधव आझाद मैदानामध्ये पोहोचलेदेखील आहेत. त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. .शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याच वेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत..Maratha Reservation: मुंबईला जाणार, आरक्षण घेऊनच परतणार : मनोज जरांगे .मुंबईतील आझाद मैदान हे गर्दीच्या ठिकाणचे आणि कमी आकाराचे आहे. आंदोलकांची संख्या जास्त अन् जागा कमी असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करण्यात आला. आंदोलकांमुळे स्थानिक आणि कामासाठी येणाऱ्यांच्या अधिकारांवर गदा येईल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला..Manoj Jarange Patil: आता चर्चा नाही, थेट अंमलबजावणी हवी; मनोज जरांगे पाटील.असे असले, तरी जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिका करणाऱ्या ‘एमी फाउंडेशन’ला न्यायालयाने फटकारले आहे. पक्षकार न करता जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध तुम्हाला दिलासा हवा? जर असाच युक्तिवाद राहिल्यास आपण ही याचिका फेटाळून लावू, असे न्यायालय म्हणाले. तर आता पक्षकार म्हणून जरांगेंनाही समावून घेऊ असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे..आंदोलनाचा मार्ग२७ ऑगस्टला अंतरवाली - पैठण - शेवगाव (अहिल्यानगर). कल्याण फाटा-आळे फाटा, शिवनेरी. (जुन्नर मुक्कामी)२८ ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर. रात्री आझाद मैदानावर पोहोचणार.२९ ऑगस्टला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार..परवानगी नाकारली तरी मुंबईला जाणारचवडीगोद्री, जि. जालना : न्यायालयाने काय निर्णय दिला हे मी अद्याप बघितले नाही. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करता येते. आम्ही कायदा व नियमाप्रमाणे न्यायालयात परवानगी मागितली आहे. आम्हाला परवानगी नक्की मिळणार. खारघर मुंबई येथे परवानगी आहे, मग आझाद मैदानावर का नाही? हा सरकारचा डाव आहे. परवानगी मिळाली नाही तरी बुधवारी (ता. २७) आम्ही मुंबईकडे निघणार आहे, असे अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (ता. २६) सांगितले..श्री. जरांगे पाटील म्हणाले, की सरकार इंग्रजांच्या काळातील पद्धतीप्रमाणे वागत आहे. सरकार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. येथे आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन देखील सरकार करू देत नाही. आम्ही शांततेत मुंबईला येत आहोत, उपोषण करणार आहे. आम्ही मुंबईला नियमांचे, न्यायालयाचे काटेकोर पालन करून उपोषण करणार आहोत. सरकारला आरक्षण देण्याचे जिवावर आले आहे. आम्ही हटणार नाही, आमचे वकील न्यायालयात जाऊन बाजू मांडणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.