Mumbai News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. आज (ता.२९) संध्याकाळी ६ वाजता आंदोलनाची परवानगी संपणार होती. .मात्र, आझाद मैदान पोलिसांनी नवे आदेश जारी करत आंदोलनाला आणखी एक दिवस चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी माहिती दिली आहे. दुपारी जरांगे पाटील यांनी पोलिसांना पत्र देऊन आंदोलनाची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला..Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील उपोषणावर; आंदोलकांचा मंत्रालय,बीएमसीकडे मोर्चा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांनी आंदोलनाची मुदत वाढवण्याबाबत पोलिस सकारात्मक विचार करतील, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे मुदतवाढ मिळणे जवळपास निश्चित झाले होते..आंदोलनामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीतमनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठा समाजातील लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) आणि इतर रेल्वे स्थानकांवर आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाल्याने मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल गाड्यांची वाहतूकही मंदावली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे..Manoj Jarange Patil: गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील .मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत येत्या काळात न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घेतला जाईल. सध्या याबाबत आरक्षण समिती चर्चा करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची मुदत वाढवण्यासाठी पोलिसांकडे विनंती केली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल." फडणवीस यांनी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले..आंदोलनाचा पुढील टप्पामनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. आंदोलकांचा उत्साह आणि मोठ्या संख्येने उपस्थिती यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. संध्याकाळी ७ वाजता जरांगे पाटील यांचे भाषण आणि माध्यमांशी संवाद याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.