Pune News : मुंबईतील मराठा आरक्षणाच्या निर्णायक आदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा घेरण्याची तयारी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवरून जरांगेनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जरांगे लढा देण्याच्या तयारीत आहेत. जरांगेच्या या इशाऱ्यामुळे सरकारचे टेन्शन पुन्हा वाढणार आहे. .राज्यात मराठवाड्यासह विविध भागात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे विरोधकांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे..अशातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी दसऱ्या निमित्त नारायण गड येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये सरकारकडे शेतकरीप्रश्नांवरून सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत. यावेळी जरांगे म्हणाले की, मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सरकारने या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा त्याशिवाय माघार घेणार नाही. सरकारने हे काम दिवाळीच्या आधी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टी नुकसान मदतीसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक.शेतकरी सांगले तसा पंचनामा कराज्या नदी काठच्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे, पीके वाहून गेली आहेत, अशा शेतकऱ्यांना एक लाख ३० हजार रुपयांची भरपाई द्या. ज्या शेतकऱ्यांचा कांदा, सोयाबीन, धान्य आणि जनावरे वाहून गेली आहेत, अशा शेतकऱ्यांना शेतकरी सांगले तसा पंचनामा करून १०० टक्के भरपाई देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे.\.Crop Damage Compensation: तत्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी .शेतकऱ्यांची खरी फाईट सुरूआता शेतकऱ्यांची खरी फाईट आता सुरू झाली आहे, असे म्हणत जरांगेंनी आता शेतकरी प्रश्नांवरून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या कुटुंबियातील सदस्याला सरकारी नोकरी या सारख्या मागण्या केल्या आहेत. दरम्यान सरकराने दिवाळीपूर्वी याबाबत निर्णय घ्यावा, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे..जरांगेंच्या प्रमुख मागण्यादिवाळीआधी मराठवाड्यात आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी द्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये भरपाई द्या. शेतजमिनीच्या नुकसानीपोटी १ लाख ३० हजार रुपये तसेच पीके आणि जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई द्या.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एकही रुपयाची कपात करायची नाही. सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पगार कापा. तसेच उद्योगपती आणि राजकीय नेत्यांकडून पैसे घ्या.शेतीमालाला हमीभाव द्या.शेतीला नोकरीचा दर्जा द्या. १० एकरांच्या आतील शेतकऱ्यांना दरमहा १० हजार रुपये पगार द्या.पीकविमा योजनेतील सर्व ट्रीगर काढून टाका..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.