Manohar Lal Khattar : हरियाणाच्या राजकारणात खळबळ, मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

Resignation of Chief Minister : देशात काहीच दिवसांत लोकसभा निवडणूका होणार आहेत. यादरम्यान हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली असून मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
Manohar Lal Khattar
Manohar Lal KhattarAgrowon

Pune News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली असून मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी (ता.१२) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. तर आता हरियाणात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे. तर आता मुख्यमंत्रिपदासाठी नायब सैनी आणि संजय भाटिया यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हरियाणात धक्कातंत्राचा वापर करत एक हाती सत्ता आणण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येथे जागा वाटपावरून . जननायक जनता पक्ष आणि भाजपमध्ये चर्चा निष्फळ ठरल्याने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीमाना दिला आहे. यामुळे येथे आता नवे सरकार स्थापन होणार आहे. यात जननायक जनता पक्ष नसणार आहे. 

लोकसभेसह विधानसभेची तयारी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. सध्या येथे  भाजप आणि जेजेपीची युती असून भाजप एक हाती सत्ता स्थापन करणार आहे.

Manohar Lal Khattar
Congress Ashok Chavhan : मोठी बातमी! काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपसोबत जाण्याची शक्यता

हरियाणात विधानसभेत बलाबल

हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आहेत. सध्या ९० जागांपैकी भाजपकडे ४१, काँग्रेसकडे ३०, आयएनएलडीकडे १०, एचएलपीकडे १ आणि ७ अपक्ष आहेत. हरियाणात ४६ आमदारांची गरज आहे.

अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com