Farmer Support: प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या रेल्वेमार्गासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच मनमाड-इंदूर हा रेल्वेमार्ग सर्वांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले..मालेगाव तहसील कार्यालयात मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मनमाड-इंदूर न्यू लाइन रेल्वेमार्गासाठी मालेगाव तालुक्यातील जमीन भूसंपादनाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते..Wardha-Nanded Railway Project : वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपयांची मदत.या बैठकीला अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रवींद्र भारदे, रेल्वे कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ अभियंता समीरकुमार, कार्यकारी अभियंता दीपक सिंग, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अल्पेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मौजे संवदगाव, सायने बु., चिखलओहोळ, देवारपाडे, झोडगे येथील शेतकरी, संघटना प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते..Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही.श्री. भुसे म्हणाले की, प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देण्यात यावी. तसेच भूसंपादन कोणत्या दराने करण्यात येणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित शेतकऱ्यांना द्यावी, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमी असून, बाजारभावाप्रमाणे भूसंपादन करण्यात यावे, या बाधित शेतकऱ्यांच्या भावना केंद्र व राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि योग्य दराने भूसंपादन व्हावे यासाठी शासनाकडे आपणही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी संपादित होणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मौजे संवदगाव, सायने बु., चिखलओहोळ, देवारपाडे, झोडगे येथील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अडचणी श्री. भुसे यांनी जाणून घेतल्या. बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले..या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांनी मनमाड-इंदौर न्यू लाइन भूसंपादनासंदर्भातील अधिसूचनेनुसार करण्यात येणाऱ्या अधिग्रहण नियमांची सविस्तर माहिती दिली. तसेच या नियमांनुसार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याबाबतही माहिती देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.