Bullock Cart : गाडी घुंगराची.... दीड लाखाची

शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील माणिक बबनराव फंड या शेतकऱ्याने जुनं ते सोनं हे खरे करून दाखविण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च करून नवीन बैलगाडी तयार करून घेतली आहे. त्या गाडीला घुंगरू बसवून तिचा उपयोग शेती कामासाठी केला जात आहे. या गाडीची तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
Manik Babanrao Fund Bullock Cart
Manik Babanrao Fund Bullock CartAgrowon

संदीप नवले

पुणे : आधुनिक शेतीची कास धरत असताना शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. पारंपरिक असलेली शेतीची साधने दुर्मीळ होत असताना आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याला अपवाद काही शेतकरी ठरत असताना शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील माणिक बबनराव फंड (Manik Babanrao Fund) या शेतकऱ्याने जुनं ते सोनं हे खरे करून दाखविण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च करून नवीन बैलगाडी तयार करून घेतली आहे. त्या गाडीला घुंगरू बसवून तिचा उपयोग शेती कामासाठी केला जात आहे. या गाडीची तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

Manik Babanrao Fund Bullock Cart
Samrudhhi Mahamarg : शिंदे फडणविसांची गाडी सुसाट

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील माणिक बबनराव फंड या शेतकऱ्याने पूर्वजांच्या प्रवासाच्या साधनांची आठवण ठेवत, नव्याने बैलगाडी बनवून घेतली. माणिक फंड यांचे वडील रांजणगावचे कारभारी स्व. बबनराव गोपाळा फंड व पाच भाऊ आणि १८ भावांचे एकत्र कुटुंब होते. खिल्लारी बैलजोडीने सजलेली त्यांची भारदस्त बैलगाडी तेव्हाही परिसरात चर्चेचा विषय असायची.

Manik Babanrao Fund Bullock Cart
Jal Jeewan Mission : जलजीवन मिशनची गाडी सुसाट

फंड कुटुंबातील स्वतः माणिक फंड यांच्यासह भाऊ दत्तात्रेय फंड आणि बाळासाहेब फंड हे आजही शेतीच करतात. तर शिवाजीराव फंड (मा. मुख्याध्यापक) एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे साडेतीनशे एकर शेती, अठरा बैल, तेरा गाई, सात म्हशी होत्या. फंड कुटुंबाने अत्यंत कष्टाने सहा पायली शेतीचा पेरा सहा पोत्यांवर नेत प्रपंच विस्ताराबरोबरच कौटुंबिक विकास साधला. आजही हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत असून, संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे.

अलीकडील काळात कुटुंबातील तरुणांनी एमआयडीसीत उद्योग व्यवसायात जम बसविला असताना, मातीशी नाळ जोडलेल्या फंड यांनी जुन्या वस्तूची जपणूक म्हणून आवर्जून बैलगाडी बांधण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या आधीच पुरंदर तालुक्यातील भुलेश्‍वरच्या पायथ्याशी टेकवडी येथील बैलगाडीच्या कामगारांकडून शानदार बैलगाडी बनवून घेतली. बाभूळ आणि सागवानी चाकजोड लाकडांचा अवलंब यासाठी केला आहे.

बैलगाडीच्या दर्शनी भागात गावाचे आराध्य दैवत असलेल्या महागणपतीची मूर्तीही आवर्जून कोरून घेतली. चाकावर व धुऱ्या, गाडीच्या दोन्ही बाजूंवर नक्षीदार कोरीव काम केले आहे. त्यावर आकर्षक पद्धतीने रंगकाम करून ती बैलगाडी सजवली आहे. गाडीच्या समोर मालदाऱ्या व सरदाऱ्या अशा दोन्ही बैलाची नावे टाकली आहेत. तर बैल गाडीला जुंपल्यानंतर जाताना आवाज येण्यासाठी शिवळाला आकर्षक घुंगरू लावून, वर फुलांचे गोंडे बसवल्याने जाता-येता ही गाडी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाठीमागील बाजूस लाकडाचे बंदिस्त झाकण लावले आहे. त्यावर गाडीचे मालक म्हणजे माणिक बबनराव फंड यांचे नाव टाकले असून, त्याखाली वडिलांचे म्हणजे कै. बबनराव गोपाळा फंड (कारभारी) असे नाव टाकले आहे. झाकणाच्या मधोमध पितळी सिंहाचे तोंड बसवून पुन्हा त्याखाली सरकार व गावाचे नाव टाकले आहे. गाडीच्या आखावर पुन्हा दोन्ही बैलांचे फोटो टाकले असून, बरोबर मधोमध महादेवाच्या पिंडीचे चित्र रेखाटले आहे.

लक्ष्मीपूजनादिवशी फंड कुटुंबीय लक्ष्मीपूजनानंतर या बैलगाडीचीदेखील पूजा केली, त्या वेळी ही बैलगाडी पाहायला परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्याकडे आजही बैलगाडा शर्यतीची चार बैले, दोन गावरान गाई व पंचकल्याणी घोडी आहे. आजही हे कुटुंब पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. एमआयडीसीच्या आगमनानंतर शेतशिवाराच्या जागेवर मोठेमोठे कारखाने उभे राहिले.

जग प्रगतीच्या दिशेने झेपावू लागले तशी प्रवासाची साधनेही बदलली. लक्ष्मी म्हणून हायफाय गाड्या, आलिशान मोटारींची पूजा केली जात असल्याच्या युगात एका अस्सल शेतकऱ्याने जुने ते सोने या म्हणीचा प्रत्यय देत तब्बल दीड लाख रुपये खर्चून गाडी घुंगराची, अर्थात भारदार बैलगाडी बनवून घेतली अन् दिवाळीच्या वेळेस थाटात तिचे पूजन केले.

बैलगाडीची वैशिष्ट्ये :
- बैलगाडी तयार करण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा लागला कालावधी
- बैलगाडीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न
- गाडीवर बारीक व सुबक नक्षीदार असे केले काम
- संपूर्ण गाडीवर केले रंगकाम
- मजबूत आणि जास्त कालावधीत टिकेल अशी गाडीची बांधणी.
- गाडीच्या ‘जू’वर दोन्ही बाजूंनी टोके काढून केली रचना.
- घुंगराचा जास्त वापर केला

प्रतिक्रिया
आपली संस्कृती व आपला शेतकरी धर्म जपण्यासाठी व पुढच्या पिढीची नाळ मातीशी जोडलेली राहावी, म्हणून गावरान जनावरे पाळण्यावर भर दिला आहे. यातून शेतीसाठी लागणारे खताचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग होतो. शेतीसाठी बैल हे महत्त्वाचे आहेत. म्हणून बैलगाडी ही वडिलांना दिवाळी भेट म्हणून आणली. त्यांनाही समाधान वाटले. दीड लाख रुपयाची घुंगराची बैलगाडी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
- प्रताप माणिक फंड, शेतकरी, रांजणगाव, ता. शिरूर
९१६८०००९९९

Manik Babanrao Fund Bullock Cart
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या  व्यापाऱ्यांकडून दीड लाखाची वसुली 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com