Mahesh Gaikwad
येत्या ११ डिसेंबरला हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
शिंदे फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
समृद्धी महामार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी सुरु केली.
हा महामार्ग एकूण 701 किमीचा लांबीचा असून नागपूर ते ठाणे जिल्ह्याला जोडणारा आहे.
ज्या वेगाने राज्याचा विकास होत आहे त्याच वेगाने शिर्डीपर्यंतचा प्रवास सुसाट होईल अशी प्रतिक्रिया या दोघांनी यावेळी दिली.