Mangrove Conservation : सेझच्या शेतजमिनीवर वाढले कांदळवन

Land Acquisition : २००६ मध्ये रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सेझच्या (स्पेशल इकॉनॉमी झोन) नावाखाली काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्‍या.
Mangrove Forest Conservation
Mangrove Forest Agrowon
Published on
Updated on

Raigad News : सरकारच्या निष्काळजीमुळे पेण तालुक्यातील दादर गावातील अडीच हजार एकर खासगी जमिनीवर कांदळवनाने अतिक्रमण केले आहे. ही कांदळवने तोडल्यास वनविभागाकडून गुन्हे दाखल केले जातात, त्यामुळे आमच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी नापीक होत आहेत. यामुळे आम्हाला कांदळवने नष्ट करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन दादर येथील शेतकऱ्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

२००६ मध्ये रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सेझच्या (स्पेशल इकॉनॉमी झोन) नावाखाली काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्‍या. खरेदी केलेल्या जमिनी वेगवेगळ्या ठिकाणी असल्‍याने शेतकऱ्यांच्या जमिनी आणि रिलायन्स कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी सरमिसळ आहेत.

Mangrove Forest Conservation
Mangrove Forest Conservation : रायगडातील कांदळवनांना मिळाली नवसंजीवनी

त्‍यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनींचा झाडेझुडपे व खारे पाण्यापासून बचाव करताना अडचणी येतात. सुमारे ३० वर्षांपूर्वी भाताचे कोठार असणाऱ्या गावातील बहुतांश शेतजमिनींवर कांदळवन, झाडाझुडपांनी व्यापल्या आहेत.

Mangrove Forest Conservation
Mangrove Conservation : कांदळवनासह जैवविविधतेत वाढ

यासंदर्भात तोडगा काढता यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत मंगळवारी (ता. ६) झालेल्या बैठकीसाठी खासदार धैर्यशील पाटील, पेणचे आमदार रवींद्र पाटील यांच्यासह कांदळवनाने बाधित झालेले शेतकरी उपस्थित होते.

संतप्त शेतकऱ्यांनी आमच्याच जमिनीचे संरक्षण करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. कांदळवनाच्या सुरक्षेबरोबरच बांधबंदिस्तीची दुरुस्ती करून भातशेतीचीही जोपासना करतो; परंतु १९८९च्या महापुरात दादर गावची बंदिस्ती तुटली आणि तेव्हापासून गावातील शेती पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. त्‍यामुळे तुटलेली बंदिस्ती बांधून देणे आणि वाढलेली झाडेझुडपे काढण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com