आंबामोहर ते फळधारणा आंबा कलमांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास, आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या आंबा मोहर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी..रासायनिक फवारणी ः (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)पहिली फवारणी ः मोहर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना,डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के ई.सी.) ९ मिलिदुसरी फवारणी ः बोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहर फुटण्याच्या अवस्थेत)लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ६ मिलितिसरी फवारणी ः दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी,इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल.) ३ मिलि किंवा बुप्रोफेझीन (२५ टक्के ई.सी.) २० मिलि.Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग.चौथी फवारणी ः तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनीथायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यू.डी.जी.) १ ग्रॅमपाचवी फवारणी ः चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनीलॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ६ मिलिसहावी फवारणी ः तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी पेक्षा जास्त असल्यास, पाचव्या फवारणीमध्ये वापरले नसलेले कीटकनाशक फवारावे.(टीप ः मोहर सुरू झाल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांची फवारणी टाळावी. फवारणी अत्यावश्यक असल्यासच करावी. परागीभवनाच्या कालावधीत फवारणी करणे टाळावे. जेणेकरून परागीभवन करणाऱ्या किडींना कोणतीही हानी होणार नाही.).कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या खतांचा अवलंब करून हापूस आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘आम्रशक्ती’ या विद्राव्य निविष्ठेच्या तीन फवारण्या कराव्यात. ‘आम्रशक्ती’ द्रावण तयार करण्यासाठी प्रति १०० लिटर पाण्यात युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश व सिंगल सुपर फॉस्फेट (०.५ टक्का) प्रत्येकी ५०० ग्रॅम अधिक झिंक सल्फेट, बोरॅक्स व कॉपर सल्फेट (०.२५ टक्का) प्रत्येकी २५० ग्रॅम अधिक सोडिअम मॉलिब्डेट १० ग्रॅम (०.०१ टक्का) याप्रमाणे मिसळावे. या फवारण्या अनुक्रमे बोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहर फुटण्याच्या अवस्थेत), बहरलेल्या मोहरावर आणि फळे सुपारी ते अंडा आकाराची फळे झाल्यावर कराव्यात. (विद्यापीठाचा प्रायोगिक निष्कर्ष आहे.).Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.किमान तापमान सातत्याने कमी राहिल्यास, आधीच मोहर आलेल्या किंवा आधीच फळे धरलेल्या फांद्यांवर पुन्हा नवीन मोहर येण्याची शक्यता असते. यामुळे अन्नद्रव्यांचा प्रवाह नवीन मोहराकडे वळून जुन्या मोहरावरील वाटाणा किंवा गोटी आकाराच्या फळांची गळ होऊ शकते. ही पुन्हा मोहर येण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड (५० पी.पी.एम.) १ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यातून या संजीवकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते. ही फवारणी कलमांवर पुरेसा मोहर आल्याची खात्री झाल्यानंतरच करावी. जिबरेलिक ॲसिडची फवारणी मोहर पूर्ण उमललेला असताना एकदा तसेच फळे मोहरीच्या दाण्याच्या आकाराची झाल्यावर पुन्हा एकदा करून घ्यावी.आंबा पिकामध्ये मोहर आल्यानंतर फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन फवारण्या कराव्यात. पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचे वजन व आकार वाढण्यास मदत होते तसेच फळांची गुणवत्ता सुधारते. फळांचा टिकाऊपणा वाढतो व फळातील साक्याचे प्रमाण कमी होते..दमट हवामानामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मिलि किंवा गंधक (८० टक्के पाण्यात विरघळणारे) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.दमट वातावरणामुळे आंब्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. अशा वेळी रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात, गळून पडलेल्या पाने गोळा करून नष्ट करावीत.रासायनिक फवारणी ः (प्रति १० लिटर पाणी) ॲझॉक्सीस्ट्रॉबिन (२३ टक्के एससी) १० मिलि किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड (०.२५ टक्का) २५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण (१:१:१००) १ टक्का किंवा कार्बेन्डाझिम (०.१ टक्का) १० ग्रॅम.शक्य असल्यास फलधारणा झालेल्या कलमांना १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी प्रति कलम प्रमाणे द्यावे. अशाप्रकारे ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे, जेणेकरून फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).काजूदमट वातावरणामुळे काजूवरील ढेकण्या (टी मॉस्किटो बग) आणि फुलकीड सारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही कीड नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करते. ही कीड मोहरातील व नवीन पालवीतील रस शोषून घेते. त्यामुळे मोहर सुकून जातो व फळे गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचा एकत्रित बंदोबस्त करण्यासाठी नवीन पालवी फुटण्याच्यावेळी, मोहर फुटतेवेळी आणि फळधारणेवेळी खालील रासायनिक कीटकनाशकांच्या तीन फवारण्या कराव्यात.पहिली फवारणी ः लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलिदुसरी फवारणी ः प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मिलितिसरी फवारणी ः लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलि.प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आर्द्रतायुक्त वातावरणामुळे काजूमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे पानांवर करड्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने करपून गळून जाते. नियंत्रणासाठी .बोर्डो मिश्रण १०० ग्रॅम किंवामॅन्कोझेब (०.२ टक्का) २० ग्रॅमप्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.काजू पिकाचे अधिक उत्पादन मिळण्याकरिता १९:१९:१९ (२ टक्के) २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून मिसळून पहिली फवारणी पालवीवर, दुसरी फवारणी मोहर आल्यावर आणि तिसरी फवारणी फळधारणा झाल्यावर करावी असा विद्यापीठाचा प्रायोगिक निष्कर्ष आहे.)- डॉ. वैभव राजेमहाडीक, ९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण, ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकणकृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.