Sindhudurg Farmers Protest: मुंबई येथे आंबा-काजू बागायतदारांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जामसंडे (ता. देवगड) येथे बागायतदारांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे केवळ १० ते २० टक्के उत्पादन मिळाल्याचा दावा बागायतदारांनी केला. नुकसानभरपाईच्या मागणीसाठी यापूर्वी ओरोस येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. मात्र या दोन्ही आंदोलनांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप बागायतदारांनी केला..Onion Farmer Protest: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन.आंबा पिकासाठी हेक्टरी ५ लाख रुपये, तर काजू पिकासाठी हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली होती. मात्र शासनाने केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने संताप व्यक्त करण्यात आला..Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांचा वर्षा बंगल्यावर उद्या मोर्चा.या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो बागायतदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान बागायतदारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला..सरकार आंबा-काजू बागायतदारांना न्याय देण्याऐवजी त्यांची गळचेपी करीत असल्याचा आरोप करीत जामसंडे येथे आंबा-काजू बागायतदार संघ आणि व्यापारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले..या आंदोलनात काका ढोके, गणेश वाळके, किरण टेंबुलकर, अजय तेली, राजू पाटील, विजय पाटील, जितेंद्र करंगुटकर, मंदार लाड, उमेश कुलकर्णी, सुधीर तांबे, तेजस घाडी, पंकज दुखंडे यांच्यासह अन्य बागायतदार सहभागी झाले होते. “आंबा उत्पादकांची गळचेपी करणारे सरकार हद्दपार झाले पाहिजे,” अशा घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.