Malegaon Sugar Factory: माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी सभासद शेतकऱ्यांना ३४५० रुपये प्रतिटन आणि गेटकेनधारकांना ३२०० रुपये अंतिम ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साखर कामगारांना २० टक्के बोनस देण्याची घोषणा कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी केली.