Green Budget : माळेगाव नगरपंचायतीचा राज्यातील पहिला हरित अर्थसंकल्प मंजूर

Mahesh Rokhde : माळेगाव नगरपंचायतीचा राज्यात एकमेव ‘हरित अर्थसंकल्प’ मंजूर झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोखडे यांनी दिली.
Nagarpanchayat Malegaon
Nagarpanchayat MalegaonAgrowon

Baramati News : माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीचा २०२४-२५ च्या हरित अर्थसंकल्पास प्रशासकीय सभेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीचा राज्यात एकमेव ‘हरित अर्थसंकल्प’ मंजूर झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोखडे यांनी दिली. या अर्थसंकल्पामध्ये ८८ कोटी २७ लाख रुपयांच्या जमा-खर्चाचे नियोजन केले आहे.

राज्यात ‘शहर विकासाचे नवे मॉडेल,’ अशी ओळख निर्माण होण्यासाठी माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने पदाधिकारी व नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार केला आहे. या गोष्टीला पोषक आणि पूरक असा यंदाचा (सन २०२४-२५) पर्यावरणपूरक अर्थसंकल्प असावा,

Nagarpanchayat Malegaon
CM Scheme : ‘माझी शाळा’ स्पर्धेत साखरा राज्यात प्रथम

असा आग्रह मुख्याधिकारी महेश रोकडे, प्रशासक तथा तहसीलदार गणेश शिंदे यांचा होता. त्यानुसार माळेगाव नगरपंचायतीच्या सन २०२४-२५ च्या हरित अर्थसंकल्पास प्रशासकीय सभेद्वारे मंजुरी मिळाली आहे. या अर्थसंकल्पामध्ये ८८ कोटी २७ लाख रुपयांच्या जमा-खर्चाचे नियोजन केले आहे.

मुख्याधिकारी रोकडे म्हणाले, की यंदाचा अर्थसंकल्प ‘हरित अर्थसंकल्प’ या संकल्पनेवर आधारित आहे. त्यामध्ये विकासाच्या योजना राबविताना त्याची सांगड पर्यावरणाशी घातली जाणार आहे.

पर्यावरणपूरक विकास योजना राबविण्याचे माळेगाव नगरपंचायतीचे उद्दिष्ट आहे. या हरित अर्थसंकल्पात महसुली व भांडवली जमेच्या माध्यमातून सुमारे ७६ कोटी २१ लाख ८९ हजार रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे.

तसेच आरंभीची शिल्लक सुमारे १२ कोटी ७ लाख ८८ हजार ८७१ इतकी अपेक्षित आहे. त्यानुसार महसुली व भांडवली खर्चाच्या माध्यमातून सुमारे ८८ कोटी २७ लाख रुपये इतक्या खर्चाचे नियोजन केले आहे. शिल्लक अंदाजे २ कोटी ७७ लाख ८७१ रुपये इतकी अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

Nagarpanchayat Malegaon
Vanbhushan Award : चैतराम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार

हरित अर्थसंकल्पातून साध्य होणाऱ्या ठळक बाबी

नवीन प्रशासकीय इमारत उभारणी (हरित इमारत), नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, खेळाचे मैदान विकसित करणे, शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, भुयारी गटार योजना राबविणे, घनकचरा व्यवस्थापन करणे,

अग्निशमन वाहन खरेदी करणे, स्वच्छ सर्वेक्षण, ग्रंथालय, महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणे, नवीन उद्याने निर्माण करणे, चौक सुशोभीकरण करणे, सौरऊर्जा, पथदिवे इत्यादी विकास कामे प्रस्तावित आहेत.

माळेगाव (Malegaon) नगरपंचायतीने सादर केलेला ‘हरित अर्थसंकल्प’ हा राज्यात एकमेव अर्थसंकल्प आहे. त्यामुळे नगरविकासाच्या क्षेत्रात माळेगाव आदर्श निर्माण करेल, असा विश्वास लेखाधिकारी नानासाहेब शितोळे यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com