Women Empowerment: मालेगाव येथील बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या मीनाक्षी अनिल देवरे, तर उपसभापतिपदी रत्नप्रभा प्रवीण पगार यांची निवड झाली. समितीच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला सभापती होण्याचा मान मिळाला. बाजार समितीत आता महिलाराज पहायला मिळणार आहे. .आवर्तन पद्धतीमुळे चंद्रकांत शेवाळे यांनी सभापतिपदाचा, तर अरुणा सोनजकर यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होत्या. त्यानंतर रिक्त झालेल्या या पदांसाठी उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १२) दुपारी एकला विशेष सभेला सुरुवात झाली. सभापतिपदासाठी शिवसेनेच्या मीनाक्षी देवरे व अद्वय हिरे गटाचे संदीप पवार यांनी अर्ज दाखल केले..Malegaon APMC : मालेगाव बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव.छाननीनंतर गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. मीनाक्षी देवरे यांना १२, तर संदीप पवार यांना पाच मते मिळाली. सभापतिपदी श्रीमती देवरे निवडून आल्याचे श्री.शेळके यांनी जाहीर केले. दरम्यान,सत्तारूढ गटातील सदस्य मतदान करताना मोबाइलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढीत असल्याचा आक्षेप श्री.पवार यांनी घेतला..Malegaon APMC Dispute : बाजार समितीतील वादात शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी.उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या रत्नप्रभा प्रवीण पगार, भिका पांडुरंग कोतकर, चंद्रकांत धर्मा शेवाळे व हिरे गटाचे रवींद्र काळू सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते.व्यापारी गटातून निवडून आलेल्या भिका कोतकर यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. चंद्रकांत शेवाळे यांनी माघार घेतली. रत्नप्रभा पगार व रवींद्र सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. श्रीमती पगार यांना १२, तर श्री. सूर्यवंशी यांना पाच मते मिळाली.रत्नप्रभा पगार यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सहायक उपनिबंधक स्वप्नील मोरे व सचिव कमलेश पाटील यांनी साहाय्य केले..पहिल्यांदाच महिलेला सभापती पदाचा मानतब्बल ३६ वेळा पुरुष सभापती झाले. मीनाक्षी देवरे यांच्या रूपाने प्रथमच महिला सभापती झाल्या. १९४९ ते २०२५ या कालावधीत ३० पुरुष उपसभापतींनी कामकाज पाहिले. २० जानेवारी २०२५ रोजी प्रथमच अरुणा सोनजकर प्रथम महिला उपसभापती झाल्या.रत्नप्रभा पगार यांच्या रूपाने सलग दुसऱ्यांदा महिलेला उपसभापतिपदाची संधी मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.