Fertilizer Management : कृषी निविष्ठांबाबत परिपूर्ण नियोजन करा

आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज (ता. २६) येथे दिले.
Fertilizer
FertilizerAgrowon

Amravati News : आगामी खरीप हंगाम (Kharif Season) लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर (Collector Pavneet Kaur) यांनी आज (ता. २६) येथे दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक महसूल भवन येथे झाली, त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी उपसंचालक अनिल खर्चान आदी या वेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ८१ हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आहेत. गतवर्षी खरीप पिकाचे ६ लाख ७४ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र होते.

येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी ८३ हजार २४ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पिकासाठी ६६ हजार ९३८ क्विंटल, कपाशीसाठी ५ हजार ८५० क्विंटल व तुरीसाठी ४ हजार ७४६ क्विंटल बियाणे लागणार आहे.

Fertilizer
Fertilizer Rate : खताच्या दरात दिलासा कधी?

धारणी व चिखलदरा तालुक्यांत मक्याचा पेरा जास्त असतो. त्यामुळे मक्याचे ३ हजार ६०० क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध असावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

युरिया, एसएसपी, डीएपी, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी १ काम १४ हजार ३१० मे. टन वाटप मंजूर आहे. त्यापैकी ४५ हजार ४७ टन खतसाठा उपलब्ध आहे.

उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत सर्वदूर उपलब्ध राहील यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे, सरळ खतांचा वापर वाढविणे, ठिबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत. खतवाटपानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुक्यांचे रेकनिहाय नियोजन करावे, असे निर्देश श्रीमती कौर यांनी दिले.

गत खरीप हंगामात १ हजार ४०० कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. ते १ हजार ३२७.८० कोटींपर्यंत साध्य झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com