Crop Damage : 'पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा'

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.त्यामुळे कांदा पिकासह गहू,हरबरा या रब्बी पिकांचे तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्याअनुषंगाने पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) पत्र देवून केली असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांनी कळविले.

Crop Damage
Chana Market : उष्णतेमुळे हरभऱ्याचे नुकसान; दर सुधारण्याचे संकेत !

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसात बाधित झालेले १९१ गावे व संभाव्य बाधित होणाऱ्‍या गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्या

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत.

त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये,याकरिता नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे,असे ही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com