Tur Variety : नवीन तूर वाणाचा गतीने प्रसारासाठी सामूहिक प्रयत्न करा

Tur Crop : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सतत विविध पिकांचे संशोधन करून वाण निर्मिती केली जातात.
Tur Crop
Tur CropAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सतत विविध पिकांचे संशोधन करून वाण निर्मिती केली जातात. हे नवीन संशोधित वाण त्वरित शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणीसाठी गेले पाहिजे. त्यासाठी शेतकरी, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आदींनी सामूहिक प्रयत्न करण्याची सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी केली.

खादगाव (ता. पैठण) येथे सोपानराव आणि संदीप डाके पाटील यांच्या शेतावर शुक्रवारी (ता. ३) गोदावरी तूर शेतीदिन पार पडला. यावेळी कुलगुरू डॉ. मणी बोलत होते. या वेळी संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, कडधान्य पैदासकार डॉ. डी. के. पाटील, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, डॉ. विष्णू गिते, डॉ. प्रशांत पगार, पैठणचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते.

Tur Crop
Tur Prices Crashed by 5 thousand: तुरीचा भाव ५ हजाराने सहा महिन्यांमध्ये पडला; तुरीची हमीभावाने खेरदी वेळेत सुरु करण्याची मागणी

पैठण तालुक्यात या हंगामात मोठ्या प्रमाणात तूर गोदावरी वाणाचे क्षेत्र विस्तारले आहे. यामध्ये खादगाव शिवार गोदावरी तूर वाणाचे क्षेत्र असलेले आहे. या गावशिवारात सुमारे सातशे एकर क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मित गोदावरी वाणाचे क्षेत्र विस्तारले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी कुलगुरू यांना दिली. या गावात मागील सात वर्षांपासून तूर शेती शेतकरी उत्तम पद्धतीने करीत आहेत.

तूर क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाची बियाणे विक्री केंद्राची सेवा फार उपयुक्त ठरली, असे तूर उत्पादक शेतकरी संदीप डाके, डॉ. अप्पासाहेब डाके, धनंजय डाके यांनी कुलगुरू डॉ. मणी यांना सांगितले. यंदा हेक्टरी सुमारे २५ क्विंटल उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की २०२६ नंतर डाळीची आयात शक्यतो न करण्याची सरकारची भूमिका आहे.

Tur Crop
Tur Rate : तुरीचे दर हमीभावाच्या आत

त्यामुळे डाळ उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान विकसित करावे. होणारे दर्जेदार तूर उत्पादन मूल्यवर्धनासाठी बियाणे म्हणून विक्री करण्यासाठी प्रयत्न व्हावे. शेतकऱ्यांनी संघटितपणे त्यासाठी प्रयत्न करावे. पाणी जास्त लागणारे पीक बदलावे लागतील. त्यासाठी तूर पर्याय ठरू शकते.

पिकांचा समतोल साधावा लागेल. कमी पाणी, कमी ऊर्जा, कमी वेळ लागणारी वाण हवी. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित मालाचे दाम ठरवावे, अशी आपली भूमिका आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव आणि त्यांचे सहकारी तसेच शेतकरी सोपान डाके, संदीप डाके यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com