Women Empowerment : शेतीच्या विकासात महिलांचे मोठे योगदान

शेतीच्या विकासातही महिलांचा मोठा वाटा आहे. आज शेतीच्या कामांत महिला मजुरांचा सहभाग अधिक आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

Akola PDKV News : जगभरात विविध क्षेत्रात महिलांनी आपली कर्तबगारी बजावली आहे. शेतीच्या विकासातही महिलांचे योगदान अनन्य साधारण आहे. महिला ही प्रबळ शक्ती आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण- स्त्री शक्ती उत्सव २०२३ अंतर्गत ‘विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा व स्त्रीशक्ती उत्सव’ कार्यक्रम मंगळवारी (ता.२८) दुपारी झाला.

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, निर्माण परिवाराचे गणेशराव देशमुख, माविमच्या प्रमुख डॉ. वर्षा खोबरागडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, डॉ. ययाती तायडे, हरीश माहेश्वरी, नरेश काकड, केव्हीकेचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, विठ्ठल सरप यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Women Empowerment
Women Empowerment : महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे : शेलार

डॉ. गडाख पुढे म्हणाले, ‘‘शेतीच्या विकासातही महिलांचा मोठा वाटा आहे. आज शेतीच्या कामांत महिला मजुरांचा सहभाग अधिक आहे. आता शेतीला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही, हे आज सन्मान केलेल्या अनेक महिलांनी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून दाखवून दिले.

अशा क्षेत्रात महिलांनी आपली शक्ती दाखवून दिली. काळाची गरज ओळखत एकात्मिक स्वरूपाची शेती व पिकवलेल्या मालावर मूल्यवर्धन होणे खूप गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले.

मोनिका राऊत म्हणाल्या, ‘‘स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिने केलेल्या कामाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी आता न थांबता ही सुरुवात समजून आणखी काम करावे. इतरही महिलांनी यापासून प्रेरणा घ्यावी.

प्रत्येक महिलेने स्वतः ची ताकद ओळखून आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करीत असला तरी ते कमी दर्जाचे समजू नका. आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना. महत्वाकांक्षा बाळगा,’’ असा सल्ला राऊत यांनी दिला.

Women Empowerment
Women ST Bus Concession : महिलांना बसच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; आजपासून निर्णयाची अंमलबजावणी

...यांना मिळाला पुरस्कार

कल्पना घोम (रा. परतवाडा), आसूला शेंडे (रा.मेंढपाला ता. शिंदेवाही, जि.चंद्रपूर), मीरा कापसे (रा. कळंब महाली, ता. जि. वाशिम), वंदना बोक्से (रा. भांबेरी ता. जि. अकोला), लतादेवी पेडापल्ली(रा. सिरोंचा, जि.गडचिरोली), वंदना टेकाळे (रा.रुईखेड टेकाळे, ता. जि. बुलडाणा), डिलेश्वरी बनसोड (रा. मासुलकसा, ता. देवळी, जि.गोंदिया),

वैशाली पिल्लारे (रा. अंजनसिंगी, ता. धामणगाव, जि.अमरावती), आरती पाठक (रा. कुरूम, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला), गोपाली दिघडे (रा. इंझोरी, ता. मानोरा, जि. वाशिम), तुळसाबाई इंगळे (रा. भिकुंडखेड, ता. जि.अकोला), स्नेहलता सावरकर (रा.करंजी, ता.जि. वर्धा),

वनमाला जाधव (रा. सुलज, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा), जयश्री गुंगले (रा. अमरावती), हर्षणा वाहने (रा. तुमसर, जि. भंडारा), सुनीता चतुरकर (रा. पातूर, जि.अकोला) या महिलांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य किट, विद्यापीठ कृषी संवादिनी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com