Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr. Prashant Kumar Patil
Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr. Prashant Kumar PatilAgrowon

Dr. Prashantkumar Patil Passes Away : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन

Death of VC : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २९) पहाटे पुणे येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.
Published on

Ahilyanagar News: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २९) पहाटे पुणे येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिक्षण घेतले त्याच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना मिळाला होता. डॉ. पाटील यांच्या अचानक जाण्यामुळे कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे.

कुलगुरू डॉ. पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाच्या त्रासानंतर त्यांना सातत्याने त्रास होत होता. बुधवारी (ता.२९) पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी कवठे एकंद (ता. तासगाव, जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr. Prashant Kumar Patil
MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी संधी

कुलगुरू डॉ. पाटील यांनी कुलगुरू पदाचा २७ फेब्रुवारी २०२१ रोजी १९ वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी विकासाच्या योजनांसह कृषी विद्यापीठातील प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोईस्कर पदस्थापना, अनुकंपा भरती, सेवानिवृत्त लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात प्रसिद्धी,

विद्यापीठामध्ये नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नियंत्रक सदाशिव पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डॉ. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr. Prashant Kumar Patil
MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

डॉ. पाटील यांचा अल्पपरिचय

नाव : डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील

गाव : कवठे एकंद (ता. तासगाव, जि. सांगली)

शिक्षण : पहिली ते चौथी (खर्डा, ठाणे)

- पाचवी ते बारावी : महात्मा गांधी विद्यालय, खानापूर, जि. सांगली

- बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) : डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व एम.टेक. (आयआयटी खरगपूर),

- पीएच. डी. (व्हीएनआयटी, नागपूर)

विविध पुरस्कार

- इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली, आर. के. जैन स्मृती पुरस्कार.

- सर्वोत्कृष्ट एस ॲण्ड टी इनोव्हेशन, एमएसएमइ, सरकारद्वारे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार. भारताचे.

- राज्यसभा गौरव पुरस्कार.

- युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, जिनिव्हा यांचे कौतुक पत्र.

- वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com