Sugar Industry Crisis: ऊस गाळपाचा शेवटचा टप्पा: कारखान्यांना तीव्र ऊस टंचाईचा सामना करावा लागत आहे!

Sugarcane Crushing Maharashtra: गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. यंत्रांच्या तोडणीवर मर्यादा, घटलेला उतारा आणि कर्नाटकातील कारखान्यांकडून उसाची पळवापळव यामुळे उद्दिष्ट पूर्ण करताना कारखाने अडचणीत सापडले आहेत.
Sugarcane Laborer
Sugarcane LaborerAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांना उसाची चणचण भासत आहे. खासगीसह अनेक सहकारी कारखान्यांनीही उशिरा येणाऱ्या उसास नियमित एफआरपीपेक्षा कालावधीनुसार टनास पन्नास ते दीडशे रुपये जादा दर देऊन ऊस उत्पादकांचा ऊस आपल्याकडे आणण्यासाठी रस्सीखेच सुरू केली आहे. यंदा उसाच्या टनेजमध्ये घट झाल्याने कारखान्यांना उद्दिष्टप्राप्तीसाठी धडपडावे लागत आहे.

सध्या कर्नाटकचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम लवकर संपल्याने हजारो मजूर पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना उपलब्ध झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात अडचणीतला ऊस असल्याने यंत्राच्या तोडीवर मर्यादा आल्या आहेत. या भागातील अनेक साखर कारखान्यांच्या यंत्राने होणारी तोडणी पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. पडलेला ऊस, खराब झालेला ऊस, साडेतीन फुटांच्या सऱ्यामुळे यंत्राने ऊस तोडणी अशक्य बनत आहे.

Sugarcane Laborer
Sugarcane Farming: उत्पादनवाढ, सुपीकतेसाठी पाचट ठरलेय फायद्याचे

भरीस भर म्हणून मध्यंतरीच्या अतिपावसामुळे उसाच्या पांढऱ्या मुळांची वाढ खुंटल्याने उसाची वाढदेखील खुंटली. परिणामी, उसाच्या उताऱ्यावर याचा परिणाम झाला. एकरी सर्वसाधारणपणे २५ ते ३० टक्के उतारा घटला आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह कारखानदार यांनाही बसत आहे. अतिपावसाने उसाचा घटलेला उतारा, महिन्याने लांबलेला हंगाम, कर्नाटकातील कारखान्यांनी उसाची केलेली पळवापळव या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करताना दमछाक होत आहे.

Sugarcane Laborer
Sugarcane Crushing : नांदेड विभागातील साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

पंधरवड्यात पालटले चित्र

सुरुवातीच्या टप्प्यात जादा यंत्राच्या वापरामुळे अड्डे जाम होण्याचे प्रकार घडत असतानाच पंधरवड्याच्या कालावधीतच उसाची चणचण भासत असल्याचे विरोधाभासी चित्र सध्या ऊस पट्ट्यात आहे. यंत्राने तोडणी बंद झाल्याने त्याचा थेट फटका गाळपाला बसला. अनेक कारखान्यांकडे सुरू असणारी चाळीस ते पन्नास टक्के यंत्रे आता बंद झाली आहेत. यामुळे उसाच्या तोडणीचा वेग मंदावला.

अजून एक महिना हंगाम सुरू असल्याने सध्या असणारा शिवारातील ऊस आपल्या कारखान्याकडे खेचण्यासाठी कारखान्यांनी जादा दरवाढ जाहीर केली आहे. सोलापूर वगळता पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर विभागांत अजूनही कारखाने सुरू आहेत. १० फेब्रुवारीअखेर सोलापुरातील १६ कारखाने बंद झाले आहेत. कर्नाटकातील हंगाम संपल्याने बेळगाव जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com