Women Farmers Empowerment Bill: कागदी ओळख की हक्कांची लढाई?
Women Farmer Identity Card: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ अंतर्गत महिलांना ‘शेतकरी’ म्हणून ओळखपत्र देण्याचा निर्णय महिलांच्या सामाजिक सन्मानासाठी एक मोठे पाऊल आहे. परंतु जोपर्यंत या ओळखपत्राला बँकिंग प्रणालीत कायदेशीर मान्यता मिळत नाही, तोपर्यंत केवळ ओळखपत्र हा हातातील कागद ठरेल.